Monday, July 1, 2024

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”

अभिनेता आर माधवन याने साऊथ सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. तो आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. अशात अभिनेत्याचा लेक वेदांतही चाहत्यांची मने जिंकण्यात कमी नाही. मात्र, वेदांतने अभिनयात नव्हे तर खेळात चमकदार कामगिरी करून लोकांची मने जिंकली आणि देशाचा गौरव केला आहे. अभिनेत्याला आपल्या मुलाचा अभिमान आहे, ज्याबद्दल त्याने सोशल मीडियावर पाेस्ट शेअर केली.

खरे तर, आर माधवन (R madhavan) याचा मुलगा वेदांत (vedaant) याने इन्विटेशनल एज ग्रुप स्विमिंग चॅपियनशिप स्पर्धेमध्ये भाग घेऊन पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. या निमित्य आर माधवनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर आपल्या मुलाचे काही फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला. फाेटाेमध्ये, वेदांत भारतीय राष्ट्रध्वज आणि पाच सुवर्ण पदकांसह पोज देताना दिसत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये तो त्याची आई सरिता बिर्जेसोबत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

हे फाेटाे शेअर करताना आर माधवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांनी वेदांतने क्वालालंपूर येथे या शनिवार व रविवारी आयोजित मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिप, 2023मध्ये भारतासाठी पाच सुवर्णसह (50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर आणि 1500 मीटर) पदकं जिंकली, ज्यामुळे आम्ही खूप आनंदी आहाेत आणि प्रदीप सरांचे खूप आभारी आहोत.”

अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहते वेदांतचे कौतुक करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटीही वेदांतचे कौतुक करत आहेत. अभिनेत्री खुशबू सुंदरने लिहिले, ‘अभिनंदन मॅडी. वेदांतला खूप प्रेम.’ अभिनेता दर्शन कुमारने लिहिले, ‘भाऊ हार्दिक अभिनंदन.’ तसेच एका युजरने लिहिले की, ‘ही सर्वात मोठी उपलब्धी आहे.’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, ‘ज्यांना वाटते की, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होईल, त्यांना हे सडेताेड उत्तर आहे. अभिनंदन सर.’ अशाप्रकारे चाहते अभिनेत्याच्या पाेस्टवर भिन्नभिन्न कमेंट करून काैतुकाचा वर्षाव करत आहेत. (bollywood actor r madhavan feeling proud as his son vedaant wins 5 gold medals for india at malaysia swimming championship)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नागराज मंजुळे यांच्या नवीन सिनेमाची घोषणा, ‘या’ महान व्यक्तीचा चित्रपटातून उलगडणार जीवनप्रवास

महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

हे देखील वाचा