Monday, June 17, 2024

महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

अभिनेत्री महिमा चौधरी आणि मनीषा कोईराला या नुकत्याच टीव्हीवरील लोकप्रिय अशा कपिल शर्मा शोमध्ये पोहचल्या होत्या. यावेळी दोघीनींही धमाल मस्ती केली. मजा, मस्तीसोबत त्या दोघीनी त्यांचा कॅन्सरसोबतच्या लढाईचा अनुभव देखील सर्वांना सांगितला. या काळात आलेले चांगले वाईट अनुभव देखील त्यांनी शेअर केले. याचवेळी महिमाने तिला कपिल शर्माने ती कॅन्सरशी लढत असताना कशी मदत केली हे देखील सांगितले.

यावेळी महिमा चौधरी म्हणाली, कपिल तिच्या स्वस्थ आरोग्याचे कारण आहे. तिला जेव्हा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर ती खूपच निराश झाली होती, मात्र अशा परिस्थितीत तिने स्वतःला प्रोत्साहित केले आणि ठरवले की फक्त विनोदी कार्यक्रम पाहायचे. यामुळे ती अनादी राहून तिचे दुःख विसरत होती. यात तिने सर्वाधिक कपिल शर्मा शो पहिला, आणि तिला खूप आनंद मिळायचा. या शोमुळे ती तिचा त्रास आणि दुःख विसरायची तिला शो बघताना कधी झोप लागायचे हे तिला देखील समजायचे नाही.”

दरम्यान मनीषा यांनी महिमा या दोघींना कॅन्सर झाला होता. मात्र मोठ्या उपचारानंतर त्या कॅन्सरमधून बऱ्या झाल्या. मनीषाला १० वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता, तर महिमाला एक वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. शोमध्ये त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या या क्षेत्रात कशा आल्या इथपासून ते त्यांच्या येणाऱ्या प्रोजेक्टपर्यंत अनेक गप्पा त्यांनी मारल्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मग मी भारत का सोडू?” म्हणत आमिर खानने दिले त्याच्या ‘त्या’ विवादित व्यक्तव्यावर स्पष्टीकरण

‘हे कठोर शासन नाही, अराजकता’ अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करने साधला सरकारवर निशाणा

हे देखील वाचा