Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड भारीच ना! दीपिका – रणवीरच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण, ‘अशी’ हाेती पहिली भेट

भारीच ना! दीपिका – रणवीरच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण, ‘अशी’ हाेती पहिली भेट

बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मंगळवारी 14 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा चाैथा वाढदिवस साजरा करत आहेत. हे जोडपे 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथील व्हिला डेल बाल्बियानेलो येथे लग्न बंधनात अडकले हाेते. दोन दिवस या जाेडप्याने दाेन वेगवेगळ्या रितीरिवाजांन नुसार लग्न केले. 14 नोव्हेंबर रोजी या जोडप्याने कोकणी रितीरिवाजानुसार लग्न केले होते. तर 15 नोव्हेंबरला सिंधी रितीरिवाजानुसार लग्न बंधनात अडकले.

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकाेण (Deepika Padukone) या जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत असून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

इटलीतील लेक कोमो येथील 700 वर्षे जुन्या व्हिला डेल बाल्बियानेलो येथे या जोडप्याने सातासमुद्रापार दोन रितीरिवाजांनी लग्न केले. या लग्नात दीपिकाने तिची आई उज्ज्वला देवी यांनी दिलेली साडी नेसली होती. ही साडी बेंगळुरू येथून खरेदी केली होती. याचा खुलासा खुद्द सब्यसाचीने आपल्या एका पोस्टमध्ये केला आहे. दीपिकाने कोकणी लग्नासाठी जरी कांजीवरम साडी घातली होती, तर तिने सिंधी लग्नासाठी सब्यसाचीने डिझाइन केलेला सुंदर लाल लेहेंगा घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका – रणवीरची संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली पहिली भेट
या जोडप्याच्या प्रेमकथेबद्दल बाेलायचे झाले तर, दोघांची पहिली भेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली. दोघांनी तिथे एकत्र जेवण केले आणि येथेच ते एकमेकांना आपले मन देऊन बसले. आजही रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या भेटीला आपली पहिली डेट मानतात. त्यानंतर त्यांनी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor ranveer and deepika wedding anniversary deepika ranveer completes four years of marriage)

हेही वाचा-
‘टायगर 3’ रिलीज होताच ऑनलाइन झाला लीक, ‘या’ साइट्सवर मोफत डाउनलोड होतोय सिनेमा
शेहनाझ गिलने घेतले बद्रीनाथचे दर्शन, सोशल मीडियावरील फोटोंनी वेधले लक्ष

हे देखील वाचा