Monday, July 15, 2024

दीपिका पदुकोणचा दिवाळी लूक पाहून रणवीर सिंग खल्लास, एकाच शब्दात पतीने केले कौतुक

सध्या दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सर्वसामान्य लोकांपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्टार्स दिवाळी पार्टीचे आयोजन करत आहेत. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडचा एक सेलिब्रिटी जोडपं गायब आहे आणि ते म्हणजे दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh). बॉलिवूडचे सर्वाधिक प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असणाऱ्या दीपिका आणि रणवीर पार्ट्यांमध्ये दिसले नाहीत हे चाहत्यांना विचित्र वाटत आहे. मध्यतरी या दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. पण दीपिकाने सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे, ज्याला पाहून रणवीर सिंग फिदा झाला आहे.

नुकताच दीपिकाने गोल्ड लूकमध्ये तिचा ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये दिवाळीचा दिवा लावला आहे. म्हणजेच दीपिकाने चाहत्यांना तिच्या खास शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने फोटो शेअर करताच तो लगेच तुफान व्हायरल झाला. काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

रणवीर सिंग झालं घायाळ
दीपिकाची ही फोटो पाहून तर फिदाचं झाला. दीपिकाच्या या फोटोवर रणवीरने फक्त एकच शब्द “स्टनर” लिहिला आहे. मग काय रणवीरच्या या कमेंटवरही चाहत्यांनी आपलं मत मांडायला सुरुवात केली. यासोबतच रणवीरच्या कमेंटने दोघे वेगळे होत असल्याच्या अफवांनाही पूर्णविराम लावला आहे.

बॉलिवूड पार्ट्या असो किंवा कोणताही पुरस्कार सोहळा रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नेहमीच या कार्यक्रमांचे आकर्षण ठरतात. परंतु यंदाच्या कोणत्याच दिवाळी पार्टीत रणवीर आणि दीपिका दिसून आले नाहीत. चाहते रणवीर आणि दीपिकाच्या जोडीला खूप मिस करत आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर त्याच्या कामाच्या वचनबद्धतेमुळे सतत विदेश दौरे करत आहे. तर दीपिका पादुकोण काही काळ विश्रांती घेत आहे. आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. तिला कोणत्याच पार्टीत एकटी जायची इच्छा नसल्याने ती पार्ट्यांपासून दूर राहिली असल्याचं या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे. या दोघांनीही दिवाळीच्या एकाही पार्टीला हजेरी लावली नसताना अफवांचा बाजार अधिकच तापला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भक्तीच्या रंगात रंगला खिलाडी, चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा!

अनुपमा नाहीतर उर्फीच ठीक, अभिनेत्रीचा टाॅपलेस व्हिडिओ पाहून भडकला वनराज

हे देखील वाचा