Wednesday, June 26, 2024

‘तुम्ही हे खूप चुकीचं करत आहात’, म्हणत रणबीर कपूरने पॅपराजींना चांगलेच सुनावले

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या मृत्यूला शुक्रवारी (३० एप्रिल) एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागच्या वर्षी याच दिवशी बॉलिवूडने एक उत्कृष्ट अभिनेता गमावला होता. त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी त्यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आईकडे म्हणजेच नीतू कपूरकडे गेला होता. दरम्यान त्याच्या सोबत त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट देखील होती. त्या दोघांना बघून पॅपराजींनी त्यांच्या भोवती घोळका घातला. त्यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने रणबीरने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

रणवीर कपूर आणि आलिया भट्ट गाडीतून खाली उतरले, तेव्हा आलिया थेट घरात गेली. पण रणवीरला पॅपराजींनी घेरले. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, पॅपराजी रणवीरच्या खूप जवळ आल्याने रणबीर त्यांना म्हणतो की, “तुम्ही लोक खूप चुकीचं करत आहात.” त्याच्या या वक्तव्यानंतर पॅपराजी त्याची माफी मागतात. त्यांनतर अभिनेता घरात निघून जातो.

रणबीर कपूरची आई नीतू कपूर हिने तिचे पती ऋषी कपूर यांच्यासाठी एका ऑनलाईन पूजेचे आयोजन केले होते. ऋषी कपूर यांची बहीण रीमा जैन यांनी एका न्यूज पोर्टलला सांगितले होते की, “नीतू कपूर आणि रणबीर कपूर एका ऑनलाईन हवनचे आयोजन करणार आहेत. आम्ही सगळे झूमद्वारे सहभागी होणार आहोत.”

सन 2018 मध्ये ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता, तेव्हा ते त्यांची पत्नी नीतू कपूर हिच्यासोबत न्यू यॉर्कमध्ये उपचार घेण्यासाठी गेले होते. तिथे जवळपास एक वर्ष उपचार घेतल्यानंतर ते 2019 मध्ये घरी परतले. त्यांनतर त्यांची तब्बेत बिघडल्यामुळे 29 एप्रिलला त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 30 एप्रिल, 2020 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, ५ तासातच मिळाले ३६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-व्हिडिओ: अभिनेत्री सुष्मिताला कथ्थक डान्स शिकताना पाहिलंय का? अजूनही करतेय चाहत्यांना घायाळ

-लाखात एक! ए.आर. रहमानच्या गाण्यावर चिमुकलीने मिसळला आईच्या सुरात सूर; पाहा हा गोंडस व्हिडिओ

हे देखील वाचा