Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, ५ तासातच मिळाले ३६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, ५ तासातच मिळाले ३६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘राधे’ या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे काही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या भरघोस यशानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे समोर आले आहे. या गाण्यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खान दिसत आहेत. या गाण्यातील जॅकलिन आणि सलमानची ‘दिल दे दिया’ या गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

कमाल खान आणि पायल देव यांनी त्याच्या आवाजात हे गाणे गायले आहे, तर शब्बीर अहमद यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तसेच हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले आहे.

या गाण्यातील जॅकलिनच्या लूकने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. या गाण्यात ती एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. तरीही तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे. या गाण्यासाठी खास जॅकलिनला घेतले आहे. पण या गाण्याची मुख्य अभिनेत्री दिशा पटानी आहे. या गाण्याला ५ तासातच ३६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसने या आधी देखील ‘किक’ या चित्रपटात ‘जुम्मे की रात है’ ह्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता.

सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट येत्या 13 मेला चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट ‘पे पर व्ह्यू’असणार आहे. राधे या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला नव्हता. पण या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

या चित्रपटाचा टिझर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा सलमान खान आणि दिशा पटानीच्या किसिंग सीनची सर्वत्र चर्चा चालू होती. या आधी सलमान खानने त्याच्या कोणत्याच चित्रपटात किस सीन दिला नाहीये. त्यामुळे त्याचा हा सीन खूप चर्चित होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाच्या अभिनयाला मिळाली गुरु रंधावाच्या सुरांची साथ! गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

-मुलगी असावी तर अशी! ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने लावले आईसोबत ठुमके, पाहा व्हिडिओ

-काय सांगता! अभिनेत्री अनुष्का शर्माने दिले होते आमिर खानच्या ‘या’ चित्रपटासाठी ऑडिशन; जुना व्हिडिओ व्हायरल

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा