Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड रणवीरने प्रियांकाचा हात पकडताच निकने केले असे काही की, नीता अंबानीही पाहतच बसल्या

रणवीरने प्रियांकाचा हात पकडताच निकने केले असे काही की, नीता अंबानीही पाहतच बसल्या

निक जोनास आणि प्रियांका चोप्राची फाेटाे अनेकदा बेस्ट कपल्स असल्याचा पुरावा देतात. इंस्टाग्रामवरील दोघांचे फोटो आणि व्हिडिओ हे सिद्ध करतात की रोमँटिक असण्यासोबतच ते खूप समजूतदार जोडपे देखील आहेत, यांच्यातील बॉन्डिंग खराेखरच पाहण्यासारखी आहे. अशातच पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो प्रियांकावर निघ जाेनसचे असलेल प्रेम दर्शवत आहे.

प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनास (nick jonas) यांचा हा व्हायरल व्हिडिओ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाचा आहे. या शाही सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास खास भारतात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार देखील सहभागी झाले होते. शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग यासारख्या दिग्गज कलाकारांनीही मंचावर दमदार परफॉर्मन्स दिला. अशात प्रियांका चोप्राही या बाबतीत मागे राहिली नाही. प्रियांकाने तिच्या नृत्याने कार्यक्रमामध्ये सर्वांचे लक्ष वेधले, यादरम्यान प्रियांकाचा पती निक जोनासने असे काही केले की, सर्वजन त्यांच्यावर काैतूकाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

खरे तर, जेव्हा प्रियांका चोप्रा फंक्शनमध्ये परफॉर्म केल्यानंतर रणवीर सिंगसोबत स्टेजवरून उतरत हाेती, तेव्हा निक जोनास आधीच तिची वाट पाहत हाेता. प्रियंका चोप्रा पायऱ्या उतरण्याआधीच निक जोनासने तिला पकडण्यासाठी हात पुढे केला. प्रियंका शेवटच्या पायरीवर पोहोचताच निक जोनासने तिचा हात धरला आणि तिला स्टेजवरून खाली आणले. निकच्या या हावभावाचे खूप कौतुक होत आहे. लोक त्याला परफेक्ट नवरा म्हणत आहेत. निक जोनासची ही स्टाईल ताे किती केयरिंग नवरा आहे हे सिद्ध करत आहे. (bollywood actor ranveer singh holds actress priyanka chopra suddenly nick jonas did something shocking nmacc event video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने
‘प्रेमाला वयाची मर्यादा नसेत..’, भर पार्टीत ऋतिक रोशनने धरली साबा आझादची चप्पल, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा