Monday, February 26, 2024

प्रियांका चोप्राच्या बॉलिवूडबद्दलच्या ‘त्या’ अनुभवाला कंगनानंतर विवेक अग्निहोत्रींचा देखील पाठिंबा

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. सध्या ती तिच्या ‘सिटाडेल’ या सिरीजमुळे चांगलीच गाजत आहे. हॉलिवूडमध्ये काम करत असूनही प्रियांका बॉलिवूडमध्ये देखील काम करत आहे. मात्र ती आता बॉलिवूडमध्ये खूपच निवडक झाली आहे. इथे काम कमी करण्याचे कारण तिने नुकतेच एका कार्यक्रमात बोलून दाखवले आहे. बॉलिवूडमध्ये तिला मनाजोगे काम मिळत नाही आणि इथे होणाऱ्या राजकारणाला ती कंटाळली असल्याचे देखील ती म्हणाली. प्रियांकाच्या या बोलण्याला बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने देखील पाठिंबा दिला आहे. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील तिचे समर्थन केले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक लेख शेअर केला आहे. या लेखात लिहिले आहे की, “जेव्हा मोठे ताकदवान लोकं आपली दादागिरी दाखवतात, तेव्हा काही लोक त्यांच्यासमोर गुडघे टेकतात, आत्मसर्पण करतात लागतात, काही हार स्वीकारतात, काही शरणागती पत्करतात आणि काही मरतात. या अशक्यप्राय-पराजय गुंडांच्या टोळीच्या विरोधात, खूप कमी लोकं त्याग करत त्यांचे वेगळे स्थान निर्माण करतात. ते खऱ्या आयुष्यातले स्टार असतात.”

कंगनाने देखील प्रियांकाला पाठींबा दिला असून, प्रियांकाच्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लिहिले, “बॉलिवूडबद्दल प्रियांका चोप्राचे हेच मत आहे. लोकांनी तिच्यासोबत देखील गॅंगअप केले वेगळे गट केले. तिला धमकावले आणि बॉलिवूडमधून बाहेर केले. एका प्रतिभावान आणि जिने स्वतःचे स्थान निर्माण केले अशा स्त्रीला भारत सोडायला भाग पाडले गेले. सर्वांनाच माहित आहे करण जोहरने तिला बॅन केले होते. हे त्यानेच केले आहे.”

दरम्यान प्रियांका चोप्रा लवकरच तिच्या आगामी स्पाय थ्रिलर सिरीज ‘सिटाडेल’ मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती एका रोमँटिक कॉमेडी असलेल्या “इट्स ऑल कमिंग बैक टू मी”मध्ये दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘जैतर’ मधून समोर येणार सत्यघटनेवर आधारित रोमांचक प्रेमकहाणी, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट

हे देखील वाचा