Wednesday, June 26, 2024

नवीन वर्षाच्या निमित्ताने रणवीर सिंगने शेअर केला अनोखा व्हिडिओ; चाहते म्हणाले,’सर्कस फ्लॉप झाल्यामुळे…’

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या नवीन वर्षाच्या पाेस्टने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. 2023 च्या आगमनानंतर, अभिनेत्याने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ चित्रपटातील एक क्लिप त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये एकीकडे नववर्षाचे सेलिब्रेशन सुरू आहे, तर दुसरीकडे लेफ्टनंट डेन गंभीर विचारात बसलेले आहेत.

ही व्हिडिओ क्लिप शेअर करत रणवीर सिंग (ranveer singh) याने लिहिले की, ‘लेफ्टनंट डेन आय कॅन फील यू.’ ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत. खरे तर 2022 हे वर्ष रणवीरसाठी काही विशेष गेले नाही. त्याचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. ‘जयेशभाई जोरदार’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, तर दुसरीकडे रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’चीही अशीच अवस्था आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

लोक रणवीर सिंगची ही पोस्ट त्याच्या फ्लाॅप चित्रपटांच्याशी जोडून पाहत आहेत. एका युजरने व्हिडिओच्या खाली कमेंट करत लिहिले कि, “सर्कस चित्रपट फ्लाॅप झाल्याचा सदमा लागला आहे भावाला.’ तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “कमबॅक चांगला हाेइल राजा, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा.” याआधी त्याचा स्पोर्ट्स ड्रामा फिल्म ’83’ ‘ बॉक्स ऑफिसवरही फारशी कमाई करू शकला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर सिंगच्या चित्रपटाबद्दल बाेलायचे झाले तर, त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित हाेत आहे. करण जाेहर दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन, आलिया भट्ट आणि शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका आहेत.(bollywood actor ranveer singh shared strange video on new year 2023 fans said shocked by cirkcus flop)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करिश्माच्या कतिलाना अदाने चाहत्यांना पडली भुरळ, फोटो गॅलरी तुमच्यासाठी

मलायका अन् अर्जुनचं ब्रेकअप झालंय का? पार्टीत एकमेकांपासून अंतर बाळगल्यामुळे चाहत्यांना पडलेत प्रश्न

हे देखील वाचा