Tuesday, January 31, 2023

मलायका अन् अर्जुनचं ब्रेकअप झालंय का? पार्टीत एकमेकांपासून अंतर बाळगल्यामुळे चाहत्यांना पडलेत प्रश्न

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत परदेशात नवीन वर्ष साजरे केले. काही त्यांच्या कुटुंबासोबत, तर काही त्यांच्या मित्र किंवा प्रियकरासह दिसले. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनीही नवीन वर्ष एकत्र साजरे केले. या सेलिब्रेशनमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अर्जुन कपूरपासून अंतर ठेवताना दिसली.

मलायका अरोरा (malaika arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) व्यावसायिक आयुष्यासाेबतच वैयक्तिक आयुष्यही एन्जॉय करत आहेत. या कलाकारंनी नुकतेच इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांसह नवीन वर्षाचे स्वागत केले. शेअर केलेल्या फाेटाेमध्ये मलायका अराेरासाेबत वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल देखील दिसत आहे, तर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांपासून दूर दिसत आहेत. युजर्स त्यांच्यातील या दुराव्याचा वेगवेगळा अर्थ काढत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

फोटोमध्ये मलायका आणि अर्जुन यांच्यातील अंतर पाहून एका युजरने लिहिले, “तुझे ब्रेकअप झाले आहे का?”, तर दुसऱ्या युजरने लिहिले, “तुमच्यात भांडण झाले आहे का, जे इतके दूर उभे आहात.” मात्र, खरं काय आहे हे फक्त मलायका- अर्जुनच सांगू शकतात. प्रत्येक नात्यामध्ये भांडण हाेणं हे एक सामाण्य गाेष्ट आहे. खरंतर नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असणे आवश्यक आहे, जर ते नसेल तर कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

फोटोमध्ये सर्व स्टार्स काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहेत. तुम्ही फोटोमध्ये मोहित मारवा, अंतरा मोतीवाला मारवा आणि कुणाल रावल यांना पाहू शकता. वरुण धवनबद्दल सांगायचे झालं, तर त्याला प्रवासाची खूप आवड आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो नॅशनल पार्कमध्ये फिरताना दिसत हाेता.(bollywood actress malaika arora actor arjun kapoor distanced themselves during new year 2023 party photos )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला चुकिचं समजू नका…’, ऋतिक रोशनचं मिळणाऱ्या लोकप्रियतेबद्दल मोठं वक्तव्य

ब्रेकींग! प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन

हे देखील वाचा