देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. हा विषाणू खूपच आक्रमकरीत्या वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील खूप वाढत आहे. त्यामुळे सरकारने अनेक कडक निर्बंध लादले आहेत. कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. अनेक कलाकार देखील मदत करत आहे. अनेकजण कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांचा पुरवठा करत आहेत, तर काहीजण मानसिक आधार देत आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद मागच्या वर्षीपासून मदत करत आहे. सोबतच अनेक कलाकार देखील पुढे आले आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोरोना रुग्णांसाठी 11 कोटी रुपये जमा केले होते.
सोबतच आलिया भट्ट देखील या सर्वांची माहिती सोशल मीडियावर देत असते. अशातच अभिनेता कमाल राशीद खान याने ट्वीट केले आहे की, “अमिताभ बच्चन सर हे 100% खरं बोलतात की, जर तुमची दान करण्याची पात्रता असेल, तर करा नाहीतर शांत बसा. दान करण्यासाठी लोकांकडे भीक का मागत आहात. काही समजलं का आलिया भट्ट आणि विराट कोहली.” केआरकेचे हे ट्वीट लोकांना अजिबात आवडले नाही.
Sir @SrBachchan is 100% correct. Agar Aapki Aukaat hai Daan Karne Ki Toh Karo! Nahi Toh Chup Chaap Baitho! Daan Karne Ke Liye Logon Se Bheekh Kyon Maangte Ho? Kuch Samajh Aaya Kya? @aliaa08 @imVkohli
— KRK (@kamaalrkhan) May 17, 2021
केआरकेच्या या ट्विटला सगळेजण प्रतिक्रिया देऊन त्याचे म्हणणे चुकीचे ठरवत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 7 कोटी रुपये जमवण्याचे लक्ष बनवले होते. परंतु या पेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे. स्वतः अनुष्का आणि विराटने 2 कोटी रुपये दिले आहेत. विराट आणि अनुष्काच्या या प्रोजेक्टमध्ये एमपीएल स्पोर्ट्स फाउंडेशनने 5 कोटी रुपये दिले आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे तिला कोरोना रुग्णांचे दुःख समजत आहे. त्यामुळे ती देखील आता हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करत आहे. नुकताच आलियाने महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत जवळपास 8 ठिकाणचे हेल्प लाईन नंबरसोबत एका गैर सरकारी संघटनांचा नंबर शेअर केला होता. जिथे कोरोना रुग्णांचा उपचार होत होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो