बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्यूटी रेखाचा नवा वंडरवूमन अवतार-लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. क्रिएटिव्ह डिझायनर आकांक्षा जैन यांनी रेखाची ही थ्रीडी आर्ट तयार केली आहे, जी आपल्या सौंदर्य आणि फिटनेसने नव्या युगातील स्लिम मुलींशी स्पर्धा करते. आकांक्षा एक डिजिटल क्रिएटर आहे आणि ती तिच्या इंस्टाग्रामवर अशा अनेक आर्ट-डिझाइन शेअर करत असते. अशातच तिने रेखाचा एक फॅशन- लूक तयार केला आहे. जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
आयुष्याचे सातवे दशक एन्जॉय करत असलेल्या रेखाने अनेक फिमेल लीड अॅक्शन चित्रपटही केले आहेत. ‘फूल बने अंगारे’ किंवा ‘खून भरी मांग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये रेखाने बोल्ड स्टाइल दाखवली आहे. अशातच आकांक्षा जैनने तिच्या डिजिटल आर्टमध्ये रेखाचा चेहरा रोबोटिक बॉडीवर वापरला आहे, ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसत आहे. क्रिएटिव्ह डिझायनर आकांक्षा जैन अनेक मनोरंजक कलाकृतींवर काम करते, जे पाहून तुम्हाला तिच्या क्रिएटिविटीची कल्पना येईल. रेखाचे क्रिएटिव्ह डिझाइन तयार करण्यासाठी आकांक्षाने Daz3D आणि ब्लेंडर सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. या आर्ट-वर्क मूवमेंटसाठी आकांक्षाने मोशन कॅप्चरचा वापर करून त्याला अधिक सुंदर बनवले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर आजकाल वर्चुअल फॅशनचा वापर सर्रास चालू आहे. फॅशन-आयकॉन म्हणून ओळखला जाणारा, रेखाचा हा वंडरवूमन अवतार वर्चुअल फॅशनचा प्रतिरूप आहे. या कलेमध्ये स्किफ फॅशनचे चित्रण करण्यात आले आहे, जे खूपच आकर्षक आहे.
रेखाचे सौंदर्य आणि तिच्या सदाबहार शैलीतील हे 3D आर्ट पाहून लोक तिच्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना रेखाचे हे आर्ट खूप मनोरंजक वाटले आणि यानंतर ते कमेंट सेक्शनमध्ये आपल्या रिएक्शंस देऊ लागले. लोकांनी ‘ओएमजी’पासून ते ‘ओह माय गॉड रेखा जी’पर्यंत अनेक कमेंट्स केल्या आहेत.(Bollywood actor rekha new avatar red lipstick with sizzling bindiya kanjivaram queens fantastic look)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ठरलं तर! ‘या’ दरम्यान पार पडणार 21वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव140 सिनेमांचा समावेश
शाहरुख खानच्या चाहत्यांना मोठा झटका, सिनेमागृहात ‘पठाण’ रिलीज होणारच नाही?