Saturday, April 20, 2024

‘मला रेखाजींसोबत डेटवर जायचे आहे..’ जेव्हा अभिनेता गोविंदाने जाहीरपणे व्यक्त केली होती इच्छा

रेखा (Rekha) ह्या हिंदी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने त्यांनी प्रत्येकालाच वेड लावले होते. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांची आणि सौंदर्याची आजही चर्चा पाहायला मिळते. रेखा यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांनाच नाही तर अनेक सिने कलाकारांनाही वेड लावले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात गोविंदापासून राकेश रोशनपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. सिमी ग्रेवालच्या अशाच एका एपिसोडमध्ये गोविंदा आणि राकेश रोशन यांनी ही इच्छा व्यक्त केली होती.

अभिनेता गोविंदा हा सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि डान्ससाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. एका कार्यक्रमात बोलताना गोविंदाने त्याला अभिनेत्री रेखांसोबत डेटवर जायचे असायचे सांगितले होते. सिमी अग्रवालच्या कार्यक्रमात गोविंदाने हा खुलासा केला होता. एकदा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये, गोविंदा आणि राकेश रोशन यांना जगातील एक व्यक्ती सांगा की तुम्हाला कोणासोबत डेटवर जायचे आहे असे विचारले होते. गोविंदा आणि राकेश रोशन या दोघांनी रेखांचे नाव घेतले. सिमी ग्रेवालने तिच्या टॉक शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सर्वांना विचारत आहे की, तुम्हाला जगभरातील कोणासोबत डेटवर जाण्याची संधी मिळाली तर तुम्हाला कोणासोबत जायला आवडेल.

जेव्हा गोविंदाला हा प्रश्न विचारण्यात आला गोविंदाने ‘मी रेखाजींचा खूप मोठा चाहता आहे.’ असे म्हणत त्यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. राकेश रोशन यांनीही रेखाला डेटवर जाण्यासाठी निवडले होते. सिमी ग्रेवालच्या शोचा पहिला एपिसोड 1997 मध्ये ऑन एअर झाला होता. सिमी तिच्या शोमध्ये मनोरंजन, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींना आमंत्रित करत असे. जिथे ती त्याच्याशी त्याच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायची. सिमीच्या शोमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, रेखा, ऐश्वर्या राय असे अनेक सेलिब्रिटी आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा अमरीश पुरी यांनी भर मैफिलीत मारली होती गोविंदाच्या कानशिलात, ‘हे’ होते कारण
सुनीता आहुजाने फेटाळली होती गोविंदासोबत चित्रपट करण्याची ऑफर, कारण जाणून व्हाल लोटपोट

हे देखील वाचा