Saturday, April 19, 2025
Home नक्की वाचा पॅपराझींना पाहून रितेश अन् जेनेलियाच्या मुलांनी केले ‘हे’ कृत्य, व्हिडिओ पाहून युजर्स थक्क

पॅपराझींना पाहून रितेश अन् जेनेलियाच्या मुलांनी केले ‘हे’ कृत्य, व्हिडिओ पाहून युजर्स थक्क

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंती मिळते. यासाेबतच रितेश आणि जेलेनियाची मुलंही खूप गोंडस आहेत. जेव्हा जेव्हा या जाेडप्याची मुलं पालकांसोबत कुठेही दिसतात, तेव्हा ते पॅपराझींना हात जोडून नमस्कार करतात. त्यांच्या या संस्काराचे सर्वजण कौतुक करतात. रितेश आणि जेनेलियाने ज्याप्रकारे मुलांचे संगोपन केले आणि मुलांमध्ये संस्कार रुजवले आहे, ते पाहून सगळेच त्यांचे कौतुक करतात. अशात अलीकडेच, जेव्हा हे जोडपे त्यांच्या मुलांसह मुंबई विमानतळावर दिसले तेव्हा सर्वांनाच त्यांची ही शैली आवडली.

तर झाले असे की, रितेशची मुलं म्हणजेच रियान आणि राहिने पॅपराझींना पाहताच त्यांच्यासमाेर हात जाेडले. यानंतर जेनेलिया आणि रितेश यांनीही कॅमेऱ्यासमोर हात जाेडले. हे पाहिल्यानंतर चाहते कपल आणि मुलांचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “लहानपणापासून चांगले वागणूक दिसते.”, त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, “हे बॉलिवूडचे परफेक्ट कपल आहे, ते इतरांसारखे शो ऑफ करत नाहीत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

नुकत्याच झालेल्या ‘वेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पॅपराझींने जेनेलियाला मुलांचा हात जोडण्याबाबत प्रश्न विचारला, ज्यावर जेनेलिया म्हणाली, “रिस्पेक्टमध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही. ही अशी गोष्ट आहे, ज्याबद्दल मी आणि रितेश खूप जागरूक आहोत आणि खूप काळजी घेतो. आम्ही आमच्या घरातही जो कोणी असेल आणि कोणतंही काम करत असेल, त्या सर्वांना ‘मामा’, ‘काका’ म्हणताे. आम्ही आमच्या मुलांनाही तेच शिकवले आहे.”

रितेश आणि जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर या चित्रपटानी बाॅक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मराठी सिनेसृष्टीत ‘सैराट’ नंतर सर्वाधिक कमाई करमार ‘वेड’ चित्रपट ठरला आहे.(bollywood actor riteish deshmukh genelia dsouza kids doing namaste to paparazzi netizens says ye hain sanskaar)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ अभिनेत्रीने अभिनयाने मराठीसोबतच गाजवली हिंदी सिनेसृष्टी; जाणून घ्या चित्रपटाचा प्रवास

आवाजाचे ‘सौदागर’ असणाऱ्या रवींद्र जैन यांच्या करियरला ‘रामायणा’मुळे मिळाली वेगळी ओळख

हे देखील वाचा