‘तुझ्यात एवढा ऍटिट्यूड येतो कुठून?’ असा प्रश्ना विचारताच, अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुझा तिच्या गोड स्माईलसाठी ओळखली जाते. इंस्टाग्रामवर जेनेलियाचे ५७ लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. अनेकदा ती तिच्या चाहत्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. जेनेलिया डिसूझाने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्यात असणाऱ्या ऍटिट्यूडबद्दल बोलताना दिसली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. (genelia dsouza posts her video and talked about her attitude)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेनेलियाने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. यात मेकअप न करता देखील ती खूप सुंदर दिसत आहे. यात तिला विचारले जाते की, “ना तु सुंदर आहेस, ना तु हॉट आहेस…मग तुझ्यात इतका ऍटिट्यूड येतो कुठून??” यावर प्रतिक्रिया देत ती म्हणते की, “हे त्यांना विचारा, जे माझी स्वप्नं बघतात.” असे म्हणत तिने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप पसंत पडला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “९९ टक्के खोडकर आणि १ टक्का एंजल.” जेनेलिया डिसूझाच्या या व्हिडिओला तिचे चाहते खूप प्रेम देत आहेत. आतापर्यंत तिच्या या व्हिडिओला १.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लाल हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून चाहते यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

जेनेलिया डिसूझाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच २०१२ मध्ये तिने अभिनेता रितेश देशमुखशी रेशीमगाठ बांधली. बऱ्याच तेलगू चित्रपटांत काम केल्यानंतर, जेनेलिया डिसूझाने ‘मस्ती’ आणि जाने तू या जाने ना’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी रिक्षाचे भाडे देण्यासाठीही नसायचे पैसे; राजपाल यादवने वाईट काळाबद्दल केली मोकळेपणाने चर्चा

-डब्बू अंकल यांचा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन

-ओठांच्या सर्जरीमुळे बदलला सलमान खानच्या अभिनेत्रीचा लूक; ‘चेहरा बर्बाद केलास’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल


Leave A Reply

Your email address will not be published.