Friday, July 5, 2024

जिवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान भाईजानने उचलले माेठे पाऊल; थेट विदेशातून खरेदी केली ‘ही’ बुलेटप्रूफ कार, फाेटाे व्हायरल

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सततच्या धमक्यांमुळे ‘किसी का भाई किसी की जान‘ अभिनेता सलमान खानने नवी बुलेटप्रूफ एसयूव्ही कार खरेदी केली आहे. ‘निसान’ कंपनीचे सर्वात महागडे वाहन ‘निसान पेट्रोल’त्याने आपल्या ताफ्यात सामील केले आहे. सध्या हे वाहन भारतीय बाजारपेठेतही दाखल झालेले नाही. सर्व सुरक्षेच्या दृष्टीने सलमान खानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकीचे ई-मेल आले होते. या प्रकरणात गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले होते. तेव्हापासून सलमान पांढऱ्या रंगाची बुलेटप्रूफ लँड क्रूझर एसयूव्ही चालवतो.

सलमान खान (salman khan) याने निसान पेट्रोल एसयूव्ही विदेशातून आयात केली आहे. सध्या हे वाहन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही. एसयूव्ही ही दक्षिण आशियाई बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय आणि महागडी वाहनांपैकी एक मानली जाते. या बुलेटप्रूफ वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते अतिशय खास आहे. भाईजानचे नवीन पांढऱ्या रंगाचे वाहन तेव्हा समोर आले होते जेव्हा तो एका कार्यक्रमात या वाहणाद्वारे पाेहचला हाेता.

सलमान खानने आपल्या ताफ्यात समाविष्ट केलेली आलिशान वाहनेही भारतात लाँच झालेली नाहीत. सध्या या वाहनाची किंमत काय आहे याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. कारण, ते देशात उपलब्ध नाही. तसेच, असे समजते की, भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 80 लाख ते 1 कोटी रुपये असेल. मात्र, सलमानची कार बुलेटप्रूफ असल्याने तिची किंमत जास्त असणार आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट या ईदला रिलीज होणार आहे. यासाेबतच तो यशराज फिल्मसच्या स्पाय युनिव्हर्सच्या ‘टायगर 3’ मध्येही दिसणार आहे. एवढेच नाही, तर सलमान लवकरच फिल्मफेअर होस्ट करतानाही दिसणार आहे. त्यानंतर तो शाहरुख खानसोबत ‘टायगर वर्सेस पठाण’च्या शूटिंगमध्येही व्यस्त असेल.(bollywood actor salman khan bought new expensive bulletproof car nissan patrol suv amid death hreats)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
“किसी के इश्क़ में…” संस्कृती बालगुडेने शेअर केलेली ‘ती’ पाेस्ट चर्चेत

हे देखील वाचा