‘किसी का भाई किसी की जान’चे नवीन गाणे रिलीज; साऊथ इंडियन लूकमध्ये दिसला सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटातील एक गाणे यापूर्वीच रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये सलमान खूपच कूल लूकमध्ये दिसत आहे. अशात आता पुन्हा एकदा निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे नवीन गाणे ‘बथुकम्मा’ रिलीज केले आहे. या गाण्यात सलमान अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

बॉलीवूडचा दबंग खान त्याच्या प्रत्येक गाण्यात खूप वेगळ्या आणि कूल स्टाईलमध्ये दिसतो. या चित्रपटाच्या ‘बथुकम्मा’ या नवीन गाण्यात अभिनेता पहिल्यांदा लुंगी घातलेला दिसत आहे. आतापर्यंत बॉडी दाखवणारा दबंग खान यावेळी पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे, जे पाहून चाहते थक्क आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी खूप छान झाली आहे. याआधीच्या गाण्यातील सलमानच्या डान्सची खूप खिल्ली उडवली गेली असली तरी हे गाणे पूर्वीपेक्षा खूपच चांगल्या पद्धतीने शूट करण्यात आले आहे.

सलमानचे नवीन गाणे रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये ते खूप लोकप्रिय होत आहे. हे गाणे पाहून चाहत्यांना चेन्नई एक्सप्रेस आणि इतर अनेक साऊथ चित्रपटांची गाणी आठवत आहेत. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे यात पूजेची काही दृश्येही दाखवण्यात आली आहेत. गाण्याचे व्हिज्युअल्सही छान दिसत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाईजानची एन्ट्री या गाण्याच्या शेवटी होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या गाण्यात चाहत्यांना सलमान अगदी वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. सलमानच्या लुकबद्दल बोलायचे झाले, तर तो लुंगी, शर्ट आणि गमझा परिधान केलेला दिसत आहे. एवढेच नाही तर त्याने काळा रंगाचा चष्मा आणि कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला दिसत आहे. या गाण्यात भाईजानसोबत शहनाज गिल, पलक तिवारी आणि कोरिओग्राफर राघवही डान्स करताना दिसत आहेत.(bollywood actor salman khan and pooja hegde starrer kisi ka bhai kisi ki jaan new song bathukamma release)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोट्यवधी खर्च करून रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायणातून किती झाली कमाई आहे का माहिती? घ्या जाणून

मैं हूं ना सिनेमातील ‘त्या’ खास भूमिकेसाठी शाहरुख खानने ट्रिक वापरत सतीश शहा यांना केले होते तयार