Wednesday, July 3, 2024

KKBKKJ | चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सलमानचा आयेशा श्रॉफसाेबतचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; युजर्स म्हणाले, ‘पहिलेपासून शर्टलेस…’

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान आजकाल त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटात ‘भाईजान’ पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर साऊथची सुपरस्टार पूजा हेगडेसोबत राेमांस करताना दिसणार आहे. चित्रपटाची स्टारकास्टही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमानचा हा चित्रपट उद्या म्हणजेच 21 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत पूजा आणि सलमानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरे तर, हा व्हिडिओ एका जाहिरातीचा आहे, जाे 80च्या दशकातील सांगितला जात आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान आपल्या मित्रांसोबत बोटीवर मस्ती करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Entertainment Say (@entertainmentsay)

ही जाहिरात 1983मध्ये निकोबार बेटांवर शूट करण्यात आली होती. हा व्हायरल व्हिडिओ ‘एंटरटेनमेंट से’ नावाच्या इंस्टाग्राम पेजने शेअर केला आहे. यासोबत, “सलमान खानची पहिली जाहिरात (1983), निकोबार द्वीपसमूहात शूट झाली”, असे कॅप्शन लिहिले आहे.

व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, “सलमान भाई पहिल्या दिवसापासून शर्टलेस होत आहे”. तर, दुसर्‍याने कमेंट करत लिहिले, “भाईचा स्वॅग सुरु झाला आहे.” व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफची पत्नी आणि टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफही त्याच्यासोबत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, व्यंकटेश, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि इतर अनेक प्रमुख कलाकार आहेत.(bollywood actor salman khan campa cola ad video go viral on internet )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आकांशा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल म्हणाली, ‘मला काही झाल्यास त्याला जबाबदार…’

सलमानच्या लूकने नव्हे तर घड्याळाने वेधले चाहत्यांचे लक्ष, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा