Saturday, June 29, 2024

भाईजानसह ‘हे’ प्रसिद्ध कलाकार कोलकात्यातील कॉन्सर्टमध्ये ठाेकणार धूम, ‘इतक्या’ लाखात मिळणार तिकिट

हिंदी चित्रपटसृष्टीचा मेगा सुपरस्टार सलमान खान कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. चित्रपटांसाेबतच अभिनेता दबंग टूर रिलाेडेड एंटरटेनमेंट कॅन्सर्टद्वारे चाहत्यांचे मनाेरंजन करताे. दरम्यान, भाईजान आता सिटी ऑफ जॉय म्हणजेच कोलकाता येथे पोहोचला आहे, ज्यामध्ये मनोरंजन, नृत्य आणि संगीत असणार आहे.

सलमान खानच्या या दबंग टूरमध्ये सोनाक्षी सिन्हा, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, प्रभुदेवा, आयुष शर्मा, मनीष पॉल आणि गुरु रंधावा असे अनेक स्टार्स दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतः सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून या टूरची माहिती दिली होती.

सलमानने दुबईसारख्या अनेक परदेशात त्याच्या दबंग टूरने धुमाकूळ घातला आहे. अशात यावेळी कोलकातामध्ये भाईजान त्याचा दबंग टूर घेऊन येत आहे. सलमानचा दबंग टूर कॉन्सर्ट 13 मे 2023 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईस्ट बंगाल क्लबमध्ये होणार आहे, जे संध्याकाळी सुरू होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानच्या दबंग टूरच्या तिकिटांची किंमत समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, असे सांगितले जात आहे की, सलमानला लाईव्ह पाहण्यासाठी चाहते 699 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंतचे तिकीट बुक करू शकतात. इतकेच नाही, तर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश हवा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 2 लाख ते 3 लाख रुपये मोजावे लागतील.

सलमान खानच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘हम आपके है काेण’, ‘कुछ कुछ हाेता है’, ‘मेने प्यार किया’, ‘बजरंगी भाईजान’, ‘बाॅडी गार्ड’, ‘किसी का भाई किसी कि जान’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत.  (bollywood actor salman khan dabangg tour kolkata ticket price how to book seats know full details here )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
TMKOC “सेटवर पुरुष मक्तेदारीसारखे…” म्हणत अभिनेत्री जेनिफरने निर्मात्यांवर लावलेल्या आरोपांवर भिडे सरांची प्रतिक्रया

‘तरुण भारत तयार होतो’ टाईम मासिकावर झळकल्यानंतर दीपिका पदुकोणचे भारताबद्दलचे ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत

हे देखील वाचा