Sunday, April 28, 2024

‘तरुण भारत तयार होतो’ टाईम मासिकावर झळकल्यानंतर दीपिका पदुकोणचे भारताबद्दलचे ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत

दीपिका पदुकोणने तिची ओळख जागतिक स्तरावर तयार केली आहे. आज तिला बॉलिवूड सोबतच हॉलिवूडमध्ये देखील मोठी ओळख आहे. अनेकदा ती विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत असते. नुकतीच संपूर्ण जगात अतिशय मोठ्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर झळकली आहे. यासोबतच तिने टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर झळकलेल्या जागतिक सेलिब्रिटींच्या एलिट यादीत आपले स्थान पक्के केले आहे. या यादीत भारतातील अतिशय मोजक्या कलाकारांचा समावेश असून यातच आता दीपिकाची भर पडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TIME (@time)

या मोठ्या उपलब्धीनंतर दीपिकाने तिचे मत मांडताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. भारतीय सिनेमाचा जगावर मोठा परिणाम होत असून, अनेक भारतीय चित्रपटांनी संपूर्ण जगाला आपली ओळख घ्यायला भाग पडल्याचे तिने सांगितले. दीपिकाला विचारले गेले की, तिला आता भविष्यात काय मिळवायचे आहे. यावर ती म्हणाली, “हा काळ भारताचा आहे. आपली मुळं, आपल्या परंपरा आमच्या इतिहासासोबत भारत आहे. मात्र हा एक नवीन आणि तरुण भारत तयार होत आहे. दोन भारत एकत्र येत आहे. यामुळे मला अत्याधिक आनंद आहे.

दरम्यान दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, तिचा ‘पठाण’ हा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा होता. यात ती शाहरुख खानसोबत झळकली होती. सिनेमाने संपूर्ण जगात मोठा व्यवसाय केला. आता लवकरच ती ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘फाइटर’ सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’
सलग 3 वर्षे ऑडिशनमध्ये अभिनेत्याला नाकारले गेले, ‘या’ चित्रपटाने रातोरात बनवले स्टार

हे देखील वाचा