Wednesday, June 26, 2024

चाहत्याच्या ‘या’ कृत्यावर संतापला भाईजान; बॉडीगार्ड शेराने दिला जाेरदार धक्का, व्हिडिओ व्हायरल

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात अलीकडेच सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फॅन्सवर चिडला आहे. तर झाले असे की, एक चाहता त्याच्याशी हॅंडशेक करण्याचा प्रयत्न करत होता, ज्यावर भाईजान संतापला. हा व्हिडिओ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आहे, ज्यामध्ये सलमान दुबईहून परतताना दिसत आहे.

दुबईहून परतलेल्या सलमानला विमानतळावर भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. या गर्दीत अनेक चाहते सलमान खानला भेटण्याचा आणि हॅंडशेक करण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सुपरस्टारच्या आजूबाजूला चाहत्यांची मोठी गर्दी आहे आणि एक चाहता सारखा सलमानशी हॅंडशेक करण्याचा प्रयत्न करत आहे. असे करताच सलमान खान त्याच्याकडे टक लावून पाहतो आणि याच दरम्यान अभिनेत्याचा बॉडीगार्ड शेरा चाहत्याला ढकलून देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

या व्हिडिओवर साेशल मीडिया युजर्स सतत कमेंट करत आहेत. काही जण सलमानला सपोर्ट करत आहेत, तर काही जण त्याला ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘भाईचा स्वॅग बघा.’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘लोक त्याला इतके का भाव देतात?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मंडळी, धमकीचे कॉल आणि ईमेल आल्यानंतर सलमानची सुरक्षा टीम हाय अलर्टवर आहे. सध्या, अभिनेत्याला Y+ श्रेणी सुरक्षा आहे आणि आजकाल तो बुलेटप्रूफ वाहनाने प्रवास करतो.

सलमानखानच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला. या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, व्यंकटेश, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि इतर कलाकार देखील आहेत. मात्र, या चित्रपटाला समीक्षकांकडून तसेच प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही परिणामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर मंद गतीने चालत आहे.(bollywood actor salman khan fan trying to shake his hand bodygaurd shera pushes him away)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची किली आणि निमा पॉलला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

बाप-लेकासाेबत ‘या’ अभिनेत्रीनं रुपेरी पडद्यावर केला हाेता राेमान्स, वाचून तुम्हालाही हाेईल ‘धकधक’

हे देखील वाचा