Wednesday, July 3, 2024

बॉलीवूडचे हे स्टार्स दरवर्षी बॉडीगार्डवर करतात इतका खर्च, पगार ऐकून तुम्हाला बसेल धक्का

बॉलिवूड स्टार्सच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. मग तो त्याचा डाएट प्लॅन असो, एअरपोर्ट लूक असो किंवा त्याच्या सिक्योरिटी बद्दलच्या गोष्टी असो… चाहते त्यांच्या आवडत्या स्टारशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. बॉलीवूड स्टार्स त्यांच्या सिक्योरिटी बाबत किती सक्रिय आहेत आणि त्यांच्या सिक्योरिटीसाठी किती पैसे खर्च करतात? चला तर मग जाणून घेऊया…

सलमान खान
सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय बॉडीगार्ड आहे. सलमानला सगळे भाईजान म्हणत असले तरी शेरा त्याला मलिक या नावाने हाक मारतो. गेल्या 25 वर्षांपासून शेरा सलमानचे संरक्षण करत आहे. सलमान शेराला आपल्या कुटुंबाप्रमाणे वागवतो. एका मुलाखतीत जेव्हा शेराला सलमानबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला होता की, ‘सलमान खानने माझ्यासाठी खूप काही केले आहे, जितके इंडस्ट्रीतील कोणीही त्याच्या बॉडीगार्डसाठी केले नसेल.’ शेराच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर माध्यमातील वृत्तानुसार, सलमान खान शेराला वर्षाचे 2 कोटी रुपये देतो.

शाहरुख खान
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही त्याचा बॉडीगार्ड रवी सिंगची विशेष काळजी घेतो. रवी हा शाहरुखची सावली आहे आणि त्याला सर्वत्र साथ देतो. माध्यमातील वृत्तानुसार, रवी सिंग बॉलिवूडमधला सर्वाधिक मानधन घेणारा बॉडीगार्ड आहे. किंग खान रवी सिंगला दरवर्षी 2.7 कोटी रुपये मानधन देतो.

आमिर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट म्हणजेच आमिर खानही या शर्यतीत दोन्ही खानांपेक्षा मागे नाही. आमिरचा बॉडीगार्ड युवराज घोरपडे त्याच्या सुरक्षेसाठी नेहमीच असतो. युवराज आमिरला सावलीप्रमाणे फॉलो करतो. युवराजच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर आमिर खान युवराज घोरपडेला वर्षाला 2 कोटी रुपये पगार देतो.

अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या सुरक्षेबाबत खूप सक्रिय आहे. अभिनेत्रीच्या सुरक्षेची जबाबदारी तिचा बॉडीगार्ड प्रकाश सिंग उर्फ ​​सोनू यांच्यावर आहे. सोनू अनुष्काच्या रक्षणासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अनुष्का सोनूला दरमहा सुमारे 10 लाख रुपये म्हणजे वार्षिक 1.2 कोटी रुपये मानधन देते.

दीपिका पदुकोण
सुरक्षेच्या बाबतीत अभिनेत्री दीपिका पदुकोणही मागे नाही. दीपिकाचा बॉडीगार्ड जलाल नेहमीच तिच्यासोबत असतो. त्याचवेळी दीपिकाही त्याला आपल्या भावाप्रमाणे मानते आणि राखीही बांधते. माध्यमातील वृत्तानुसार, जलालला वर्षाला सुमारे 1.2 कोटी रुपये पगार मिळतो.(Bollywood actor salman khan to actor shah rukh khan know salary of these famous bodyguards of bollywood celebrities)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भावासोबत फाेटाेत दिसणारी ही गोंडस मुलगी आहे तरी काेण? आज आहे बॉलिवूडची मोठी स्टार
अक्षयच्या बुटाखाली दाखवलेल्या भारताच्या नकाशाने देशभक्तांचे रक्त उसळले; म्हणाले, ‘हा कॅनेडियन कुमार …’

हे देखील वाचा