Friday, April 26, 2024

अक्षयच्या बुटाखाली दाखवलेल्या भारताच्या नकाशाने देशभक्तांचे रक्त उसळले; म्हणाले, ‘हा कॅनेडियन कुमार …’

बाॅलिवूड स्टार अक्षय कुमार याने ‘नॉर्थ अमेरिका टूर’चा प्रमोशनल व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवर शेअर केला आहे. मात्र, अभिनेता टूरवर जाण्यापूर्वीच सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. पुन्हा एकदा युजर्स अक्षयला कॅनेडियन अभिनेता म्हणत ट्राेल करत आहेत. त्याच्या सिटीजनशिपवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया…

आपल्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमार (akshay kumar) याने लिहिले की, ‘मनोरंजन 100 टक्के होईल. शुद्ध देसी एंटरटेनमेंट थेट नॉर्थ अमेरिकेत. तुमचे सीट बेल्ट बांधा. आम्ही मार्चमध्ये येत आहोत.’या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसोबत दिशा पटनी, मौनी रॉय, सोनम बाजवा दिसत असून हे कालाकार ग्लोबवर फिरताना दिसत आहेत. यादरम्यान, अक्षय कुमारने भारताच्या नकाशावर पाऊल ठेवल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. त्यामुळे या अभिनेत्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

अक्षयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत असून युजर्स यावर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत. एका ट्विटर युजरने कमेंट करत लिहिले, ‘कॅनडाचा अभिनेता भारतीय नकाशावर चालत आहे. हा भारतीयांचा अपमान आहे. या लज्जास्पद कृत्याबद्दल तुम्ही 150 कोटी भारतीयांची माफी मागितली पाहिजे.’ तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘भाऊ, किमान आपल्या भारताचा आदर तरी राखा.’ ट्विटरवर लोक अक्षयला ट्रोल करत आहेत. अनेक युजर्सने अक्षय कुमारला कॅनेडियन कुमार म्हटले आहे.

अक्षयला त्याच्या नागरिकत्वावरून अनेकदा ट्रोल केले जाते. अभिनेत्याने ताे मनापासून भारतीय असल्याचे अनेकदा सांगितले आहे. कॅनडाचा पासपोर्ट मिळूनही 9 वर्षे झाली असले तरी ताे भारतातच राहत आहे. माझे चित्रपट चालू नसताना मला कॅनडाचा पासपोर्ट मिळाला होता, असे तो म्हणाला होता.(bollywood actor akshay kumar trolled on walking on indian map for promotional video netizens angry with him article)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जनतेला खुश करण्याच्या राड्यात शालिन आणि अर्चनाचा झाला तमाशा, डान्स करताना धपकन पडले अन्…

इस्लामसाठी अभिनय क्षेत्र सोडणारी ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री देणार गुडन्युज? फोटो शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा