Monday, July 1, 2024

अर्रर्र! अंबानींच्या पार्टीत सलमान खान बनला बॅकग्राउंड डान्सर; युजर्स म्हणाले, ‘पैशाने काहीही केले जाऊ शकते…’

सलमान खानची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. चाहत्यांमध्येही भाईजानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सलमाननेही अनेकवेळा मित्रांना कठीण प्रसंगी मदत करून मैत्रीचे उदाहरण मांडले आहे. भाईजानची देशातील उद्योगपती कुटुंब अंबानी यांच्याशीही चांगले संबंध आहेत. अशात सलमान नुकताच मुंबईत झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिथून त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल हाेत आहे, ज्यामुळे अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सलमान खान (salman khan) याचा हा व्हिडिओ मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या संगीत सेरेमनीमधील आहे. व्हिडिओमध्ये भाईजान बॅकग्राउंडमध्ये डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सलमान खानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे, स्टेजच्या मागे नाचणारा हा भाईजान आहे यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जात आहे.

ईशा अंबानीच्या लग्नसोहळ्यातील या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी ‘कुछ कुछ होता है’ मधील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर गिटार घेऊन स्टेजवर परफॉर्म करत आहेत. त्याच्यासोबत त्याची मंगेतर राधिका मर्चंटही स्टेजवर सामील झाली आहे, तर सलमान खान बॅकग्राउंडला जमिनीवर बसून नाचताना दिसत आहे.

व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘क्या बकवास है भाई को बॅकग्राउंड डान्सर बना दिया’, तर दुसरा युजर म्हणाला, ‘सल्लू भाई विकल्या जाणार याचा कधी विचार केला नव्हता’ त्याचवेळी आणखी एका युजरने ‘पैशातून काहीही केले जाऊ शकते’ अशी कमेंट केली आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय भाईजानचा ‘टायगर 3’ हा चित्रपटही लवकरच चाहत्यांच्या भेटीली येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खानसाेबत पूजा हेगडेही दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल यांचाही समावेश आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी चित्रपट निर्मित केला आहे.(bollywood actor salman khan turns background dancer for ambanis at their grand celebration watch viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने
‘प्रेमाला वयाची मर्यादा नसेत..’, भर पार्टीत ऋतिक रोशनने धरली साबा आझादची चप्पल, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा