Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड हिंदू – मुस्लीम प्रश्नावर शाहरुखने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘कलाकाराचा स्वभावच…’

हिंदू – मुस्लीम प्रश्नावर शाहरुखने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘कलाकाराचा स्वभावच…’

शाहरुख खान त्याच्या विनोदी प्रतिक्रियांसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पत्रकार आणि लोकांच्या कठीण प्रश्नांना तो इतक्या हुशारीने उत्तर देतो की, सगळेच त्याचे चाहते होतात. अशाच एका कार्यक्रमात एका व्यक्तीने त्याला हिंदू-मुस्लिम या प्रश्नावर गोवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अभिनेत्याने दिलेले उत्तर खरोखरच कौतुकास्पद होते.

इव्हेंटमध्ये एक व्यक्ती शाहरुखला म्हणाली की, “तू चांगला मुस्लिम आहेस. समजा तुझे नाव शेखर कृष्ण असते…” अशात व्यक्ती पुढे बाेलायच्या आधीत अभिनेत्याने व्यत्यय आणला आणि म्हणाला, “शेखर राधा कृष्ण, शाहरुख.” अभिनेत्याचे हे बोलणे एकून उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या. ताे व्यक्ती पुढे म्हणाले, “तुम्ही हिंदू असता, तर लोक तुमच्याशी कसे वागले असते असे तुम्हाला वाटते?”

शाहरुख खान म्हणाला, “मला वाटतं नाव काहीही असलं तरी याचा फरक पडणार नाही. हे मला समजून सांगायचे आहे. माझ्या व्यवसायामुळे किंवा धर्मामुळे मला माझ्या सुंदर देशात असे कधीच वाटले नाही. मला अशा गाेष्टी ऐकून खूप विचित्र वाटतं. कलाकाराचा स्वभावच असा असतो की, तुम्ही किंवा तो कोणत्या समाजातून आलात याने त्याला काही फरक पडत नाही. तू मला कोणत्याही नावाने हाक मार, माझा स्वभाव तसाच राहील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

57 वर्षांच्या शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे नवा इतिहास रचला आहे. शाहरुखच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अभिनेत्याच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटात पहिल्यांदाच तापसी पन्नूसाेबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यासाेबत अभिनेता दिग्दर्शक अॅटली यांच्या ‘जवान’ या चित्रपटातही अतिशय मनोरंजक भूमिका साकारत आहे.(bollywood actor shah rukh khan epic response when user asked if you were hindu how would see people pathaan actor answer won millions hearts )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सर्वांना हसवणाऱ्या कपिल शर्मामुळे रडले कोरियन चाहते, कारण ठरला आगामी सिनेमा; बातमी वाचाच

‘प्राजु गुलाबापेक्षाही खूप सुंदर आहे’ म्हणत फॅनने घातली चक्क प्राजक्ता माळीला लग्नाची मागणी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा