Saturday, June 29, 2024

सुहाना खानच्या ‘नो मेकअप लूक’ व्हायरल, काजोलची मुगली न्यासा झाली ट्रोल युजर्स म्हणाले…

सुहाना खान बॉलिवूडच्या आवडत्या स्टार किड्सपैकी एक आहे. बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज असलेली सुहाना बर्‍याचदा पार्टी, इव्हेंट किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये दिसत असते. प्रत्येक वेळी ती तिच्या उत्कृष्ट लूकने, ड्रेसिंग सेन्सने आणि तिच्या ग्लॅमरस शैलीने सर्वांना आश्चर्यचकीत करते. तिच्या गॉर्जियस लूक आणि हाॅट फिगरने चाहते वेडे झाले आहेत. अशातच या सर्वांमध्ये सुहानाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती अतिशय साधी आणि सोबर दिसत आहे.

सुहाना ( suhana khan) हिचा हा व्हिडिओ पॅपराझींने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जिथे चाहते या पोस्टवर कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. साेशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, रविवारी (दि. 15 जानेवारी) सुहाना तिची आई गौरी खानसोबत वांद्रे येथे एका फ्रेंडला भेटण्यासाठी आली होती. जिथे सुहाना तिच्या फ्रेंडच्या घराबाहेर स्पॉट झाली.

यावेळी सुहाना मेकअपशिवाय होती. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, सुहानाने राखाडी रंगाचं जॅकेट, पांढऱ्या रंगाचे स्लीव्हलेस टॉप आणि काळ्या रंगाचा पँट परिधान केला आहे. तर गौरी सॉफ्ट पिंक नी लेन्थ ड्रेस आणि व्हाइट जॅकेटमध्ये दिसली. व्हिडिओमध्ये सुहाना कारमध्ये बसलेली दिसत आहे, तर तिची आई तिच्या फ्रेंडच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मंडळी, ही पाेस्ट नेटिझन्स दोन भागात विभागात आहेत. काही सुहानाची तुलना काजाेलची लेक न्यासा साेबत करत आहे, तर काही न्यासाची तुलना सुहानासाेबत करत आहेत. या पाेस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले, “काहीही असो, शाहरुखची मुलगी नेहमीच सभ्य दिसते. ती नो ड्रामा नो अटेंशन सीकर आहे, ती काजोलची लेक न्यासासारखी अजिबात नाही”, तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “खरं तर मला सुहाना खूप छान वाटते. ती बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या स्टारची मुलगी असूनही इतर नेपो मुलांपेक्षा अधिक विनम्र आणि दयाळू आहे.”, तर तिसऱ्या चाहत्याने लिहिले की, “कोणतीही प्लास्टिक सर्जरी आणि मेकअप न करताही ती खरोखरच गोंडस दिसते.”

काजोल-अजय देवगणची लेक न्यासा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, नुकतेच आलेले काही फोटो पाहून काही लोक न्यासाच्या लूकवर प्रश्न उपस्थित करताना दिसले. नेटिझन्सनी सोशल मीडियावर दावा केला की, काजोलच्या मुलीने सौंदर्य उपचार घेण्यासोबतच प्लास्टिक सर्जरीही केली आहे. मात्र, नंतर हे वृत्त काजोलने फेटाळून लावले.(bollywood actor shah rukh khan gauri khan daughter suhana seen without makeup netizens said no attention seeker like kajol ki beti nysa devgan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ला श्वेताचा हटके ट्विस्ट, बाथराेब घालून गेली बाथरूममध्ये अन्…

बिग बाॅसमधील पुरुष स्पर्धकांनी केलं मुलीचं रुप धारण, पाहून महिला स्पर्धकांनाही बसेल धक्का

हे देखील वाचा