×

अनेक महिन्यांनी आर्यन खान सोशल मीडियावर परतला, सुहाना खानसाठी लिहिली खास पोस्ट

मागच्यावर्षी शाहरुख खानचा लाडका लेक अं’मली पदार्थ सेवनाच्या आरोपाखाली अडकला आणि एकच गोंधळ उडाला. बॉलिवूडच्या किंग खानचा लेक एवढ्या मोठ्या केसमध्ये अडकल्यामुळे सर्वच लोकं शॉकमध्ये होते. या केसमध्ये त्याला जामीन मिळाल्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणं, मीडिया आणि सोशल मीडियापासून लांब गेला. मागील जवळपास ७/८ महिन्यांपासून सोशल मीडियापासून लांब असलेला आर्यन आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. आर्यन खानने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ऑगस्ट २०२१ मध्ये शेवटची पोस्ट शेअर केली होती त्यानंतर तो यापासून लांब होता, मात्र आता त्याने बऱ्याच काळानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

लवकरच आर्यन खानची बहीण आणि शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचा लवकरच ‘द आर्चीज’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर आणि टिझर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. या नवीन प्रवासासाठी शाहरुख खान आणि गौरी खान दोघांनी देखील त्यांच्या लेकीला शुभेच्छा दिल्या. यात सुहानाचा भाऊ आर्यन खान देखील कसा मागे राहील? त्याने देखील त्यांच्या बहिणीला शुभेच्छा देताना एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्यन खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने ‘द आर्चीज’चे पोस्टर आणि टिझर शेअर करत सुहानासाठी लिहिले, “‘बेस्ट ऑफ लक बेबी सिस्टर। go kick some a**…चित्रपटाचा टिझर कमाल आहे. सर्वच छान दिसत आहे.”

तत्पूर्वी आर्यन खानला २०२१ साली अं’मली पदार्थ केसमध्ये मुंबईच्या एका क्रूझवरून ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात अनेक लोकांचे नाव समोर आले होते. नंतर जवळपास एक महिना आर्यन खान जेलमध्ये होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला . पुढे त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे खूपच कमी केले. दरम्यान ‘द आर्चीज’ हा सिनेमा झोया अख्तरने दिग्दर्शित केला असून, हा सिनेमा ‘आर्चीज’ या कॉमिकवर आधारित आहे. ‘द आर्चीज’ या सिनेमात सुहाना खानसोबतच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post