Monday, July 1, 2024

‘निवडणुकीच्या वेळी धर्मांतराचा हा चित्रपट का?’ ‘द केरळ स्टोरी’वर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडले मौन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडतात. अशात आता त्यांनी अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी‘ या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या चित्रपटामुळे राज्याच्या शांततेला धोका निर्माण होत असेल, तर त्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडू नये.

माध्यमााना दिलेल्या मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha ) म्हणाले, “सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की, मी ‘द केरळ स्टोरी’ पाहिली नाही. मी प्रवासात इतका व्यस्त आहे की, मला माझी लेक सोनाक्षी सिन्हाची ‘दहाड’ ही वेबसिरीज अजून बघता आलेली नाही. मी हेही सांगू इच्छितो की, मी नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभा आहे.”

अभिनेता पुढे म्हणाला, ‘माझा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीला त्याला जे म्हणायचे आहे ते बोलण्याचा अधिकार आहे, परंतु कोणत्याही राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या किंमतीवर नाही. एखाद्या चित्रपटामुळे राज्यातील शांततेला धोका निर्माण होत असेल, तर त्या स्वातंत्र्यावर बंदी घालावी. अभिव्यक्तीचा अधिकार असेल, तर प्रशासनाचाही अधिकार आहे.

याशिवाय शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजवर बंदी घालण्याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “ममता बॅनर्जी या दूरदृष्टीच्या नेत्या आहेत. हा चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू शकतो, असे त्यांना वाटत असेल, तर त्यासाठी त्यांच्याकडे कारण असावे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचेही त्या नेहमीच समर्थन करतात. जर त्यांना वाटत असेल की, हा चित्रपट एखाद्या विशिष्ट वर्गासाठी धोकादायक आहे, तर त्यांना योग्य वाटेल ते करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.”

शत्रुघ्न सिन्हा शेवटी म्हणाले, “विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या खूप आधी मी काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल आवाज उठवला होता, पण त्यावेळी सरकारने अजिबात लक्ष दिले नाही. विवेकच्या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांबद्दल वाद सुरू झाला असेल, तर मला त्याचा आनंद आहे. संवेदनशील विषयांवर चित्रपट बनले पाहिजेत, पण ते संवेदनशील पद्धतीने बनवले पाहिजेत. निवडणुकीच्या वेळी धर्मांतराचा हा चित्रपट का? ही वेळ थोडी संशयास्पद दिसते.” असे अभिनेत्याने आपली बाजू मांडत सांगितले.(bollywood actor shatrughan sinha breaks his silence on the kerala story says why this film about religious conversion during election time)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’

सलमानची बहीण अर्पिता पती आयुषसोबत दिसली ‘या’ लूकमध्ये, सोशल मीडियावर लोकांनी केल्या ‘अशा’ कमेंट

हे देखील वाचा