Sunday, December 3, 2023

एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरवर अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी साेडले माैन; म्हणाले, ‘काहीवेळा ते हाताळणे…’

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्याची पत्नी पूनम सिन्हा यांची प्रेमकथा खूप फिल्मी आहे. प्रत्येक प्रेमकथेत जसे चढ – उतार येतात तसेच या प्रेमकथेतही ही वेळ आली.  शत्रुघ्न सिन्हा यांनी अरबाज खानच्या ‘द इनव्हिजिबल’शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

या शोमध्ये स्वत:बद्दल बोलताना अभिनेता शत्रुघ्न (shatrughan sinha) म्हणाला, “आम्हाला नव्हतं माहित आमच्या नशिबात काय हाेणार आहे. मला माहित नव्हते की, मी अभिनयाचे धडे घेईन, संघर्ष करेन, स्टार बनेन आणि मध्येच एक दिवस हे सर्व… होय, आम्ही बोलणे बंद केले. हा माझा निर्णय होता. ही अशी वेळ होती जेव्हा माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळे घडत होते, मी तिकडे वळणार नाही. चूक माझी होती, मी या नात्यातून बाहेर पडण्यासाठी निमित्त शोधत होतो. एक दिवस मी पूनमला म्हणालो, तू माझ्यासाठी खूप चांगली आहेस, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही.”

अभिनेत्यानं मान्य केली स्वत:ची चूक
संभाषणाण अभिनेता पुढे म्हणाला, “ही पूर्णपणे माझी चूक होती. मी स्टारडमच्या गर्तेत होतो. पूर्वी मला असे वाटायचे की, कोणत्याही स्त्रीला माझ्यात रस नाही, पण जसजसे परिस्थिती बदलली तसतसे माझे नियंत्रण सुटले. हा मानवी स्वभाव आहे, मी तिला एक प्रकारे घटस्फोट दिला. मी तिच्याशी सर्व संपर्क ताेडले, पण मला कळले की, पूनम मला शोधत आहे आणि मला मिस करत आहे. तिने माझ्या स्टाफला माझी योग्य काळजी घेण्यास सांगितले.”

अशाप्रकरे झाली दाेघांची भेट
शत्रुघ्नने सांगितले की, “त्याची आणि पूनमची ट्रेनमध्ये भेट झाली. शत्रुघ्न आईला सोडून घरी येत असताना भावूक झाले होते आणि त्यावेळी तिथे समोर पूनम बसली होती. तिच्या आईने तिला रागावले म्हणून तिही रडत होती.” शत्रुघ्न पुढे सांगतात, “पूनम खूप सुंदर होती आणि मी इतकी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती. पटनामध्ये इतकी सुंदर मुलगी असू शकते याची मला कल्पना नव्हती.” तर इथूनच शत्रुघ्नला पूनम आवडली आणि दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.(megastar shatrughan sinha opens up about dumping wife poonam in arbaaz khan talk show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मधुचंद्राच्या रात्री असा सजवला होता स्वरा भास्करचा बेड, फोटो शेअर करून आईला दिले श्रेय

अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार

हे देखील वाचा