Monday, July 1, 2024

बला’त्कार प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याने 7 वर्ष फाेडली खडी, आता आराेप करणारीच म्हणतेय…

शायनी आहुजा शेवटचा 7 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘वेलकम बॅक’ चित्रपटात दिसला होता. मात्र, या चित्रपटात अभिनेत्याची छोटीशी भूमिका होती, ज्याने कलाकार नाराज झाला हाेता. काय झाले असे, ज्यामुळे अभिनेत्याची लाेकप्रियता क्षणात खालावली आणि 2009 साली न्यायालयाने त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावली? चला जाणून घेऊया..

साधारण 2009 सालची गोष्ट आहे, जेव्हा शायनी आहुजा याच्यावर त्याच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. शायनी तुरुंगात असेपर्यंत तो पश्चातापाच्या आगीत जळत राहिला. तब्बल 3 महिन्यांनंतर तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. ज्या महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता, तिने आपले वक्तव्य मागे घेतले. मात्र, काेर्टाने त्याला 2011 मध्ये 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

कोर्टात पुन्हा अपील केल्यानंतर शायनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की, “त्यांच्यामध्ये जे काही झाले ते दोघांच्या संमतीने झाले.” यानंतर महिलेनेही आपल्या जबाबात शायनीला निर्दोष सांगितले आणि म्हणाली की, “मी जे काही केले ते शायनीच्या घरील काम करणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून केले.” यानंतर शायनीची जामिनावर सुटका झाली.

शायनी तुरुंगातून बाहेर आला होता, पण या घटनेने लोकांसमोर त्याची प्रतिमा इतकी बिघडली, की कोणत्याही चित्रपट निर्मात्याने त्याला आपल्या चित्रपटात कास्ट करावे असे वाटले नाही, परंतु एका व्यक्तीने त्याला स्वत:पासून दुर केले नाही, ती म्हणजे त्याची पत्नी अनुपम आहुजा. तिचा असा विश्वास होता की, पतीला अशा गुन्ह्याची शिक्षा झाली आहे. जी त्याने कधीही केली नव्हती. पत्रकार परिषदेत अनुपम आहुजा यांना जेव्हा विचारण्यात आले की, शायनीला पुन्हा कोणत्या कारणासाठी शिक्षा देण्यात आली, तेव्हा तिने सांगितले की, “मला नेमके कारण माहित नाही, परंतु हे सेलिब्रिटी किंवा सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे असू शकते”, असे शायनीच्या पत्नीचे मत हाेते.

शायनी आहुजा पंजाबी कुटुंबातील आहे. त्याचे वडील सैन्यात होते. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केले. कॉलेजच्या काळापासूनच त्याला अभिनयाची आवड होती, जी त्यांनी नंतर पूर्णही केली. शायनीने 2006 मध्ये ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यासाठी त्याला फिल्मफेअर बेस्ट मेल डेब्यू अवॉर्ड पुरस्कार मिळाला. तेव्हा तो बॉलिवूडचा पुढचा सुपरस्टार मानला जात होता, पण 2009 च्या घटनेने सर्व काही बदलून टाकले. अभिनेता आता 49 वर्षाचा आहे. त्याने ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘गँगस्टर’ आणि ‘भूल भुलैया’ यांसारख्या काही अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. (bollywood actor shiney ahuja 7 years jailed after maid rape accusation later called him innocent)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनोज वाजपेयी यांचे ट्विटर अकाउंट हॅक, इंस्टाग्रामवर नोट शेअर करून चाहत्यांना केले सावध

‘देशातील सगळ्या मुलींनी तिच्याकडून शिकायला हवं…’, हनी सिंगने उर्फी जावेदचं केलं कौतुक

हे देखील वाचा