Saturday, June 29, 2024

शुभ मंगल सावधान! कियारा अन् सिद्धार्थ पुढच्या वर्षी या महिन्यात अडकणार लग्न बंधनात

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता अली फजल आणि लाेकप्रिय अभिनेत्री रिचा चढ्ढा यांच्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड जाेडप लग्न बंधनात अडकणार आहे. ते दुसरं काेणी नसून बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्हाेत्रा आणि कियारा अडवाणी आहे. हे दाेघेही  पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. या दाेघांच्या अफेअरची चर्चा अनेक दिवसांपासून साेशल मीडियावर रंगली हाेती. मात्र, दाेघांनीही ते कधीच उघडपणे स्वीकारले नाही. यानंतरही चाहत्यांकडून दोघांच्या लग्नाचा अंदाज लावला जात आहे.

पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात सिद्धार्थ-कियारा अडकनार लग्न बंधनात
माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (kiara advani) पुढील वर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अलीकडेच सिद्धार्थ आणि कियारा कॉफी विथ करणच्या सेटवर पोहोचले होते. यादरम्यान करण जोहरशी बोलताना दोघांनीही लग्नाबाबत मुत्सद्दी उत्तर दिले. दोघांनीही उघडपणे त्याची पुष्टी केली नाही. मात्र, संकेत  दिले की, ते लग्नासाठी तयार आहेत. अशातच दाेघे पुढच्या वर्षी लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

शेरशाह चित्रपटाच्या सेटवर वाढली जवळीक 
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची कॅप्टन बत्राच्या जीवनावर बनलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर मैत्री झाली होती. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकाना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याची चर्चाही साेशल मीडियावर रोज रंगत असते. तसेच दोघेही अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अशातच दोघेही आता रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी तयार झाले असून पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे माहिती येत आहे.

करण जोहरला दिलं लग्नाचं आमंत्रन
कॉफी विथ करणमध्ये पोहोचलेल्या सिद्धार्थ आणि कियाराने करणला त्यांच्या लग्नात येण्याचे आमंत्रणही दिले होते. कियाराने सांगितले होते की, “ती सिद्धार्थसोबत लग्न करण्यास तयार आहे. यासोबत कियाराने शाहिद कपूर आणि करण जोहरला त्यांच्या लग्नात ‘डोला रे’ गाण्यावर डान्स करण्यास सांगितले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अश्विनी यार्दीच्या वाढदिवसात दाेघांनी एकत्र लावली हजेरी
नुकतंच अश्विनी यार्दीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हाेते, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे देखील उपस्थित हाेते. साेशल मीडिायावर दाेघांच्या एन्ट्रीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल हाेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करादैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कांजीवरम साडी अन् केसांत गजरा शैहनाजचा व्हायरल लूक

आम्रपाली दुबेने नागरिकांना शिकवला जिवणाचा पाठ, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा