Wednesday, December 6, 2023

चित्रपटाच्या पोस्टरवर झाला मोठा वाद, रिचा चढ्ढाची जीभ कापणाऱ्या बक्षीस जाहीर

अभिनेत्री रिचा चड्डा लवकरच तिच्या आगामी ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटात दिसणार असून, हा सिनेमा येत्या २२ तारखेला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मात्र ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ सिनेमा सातत्याने विविध वादांमध्ये अडकत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये रिचा चड्डा हातात झाडू घेऊन उभी आहे. यावर अनेकांनी टीका केली असून रिचाला जीवे मारण्याची धमकीही दिली जात तर काही लोकांनी तिला तिची जीभ कापण्याची देखील धमकी दिली आहे.

रिचाने याबद्दल सांगितले की, “मला जीवे मारण्याची, जीभ कापण्याची, घरावर दगडफेक करण्याच्या धमक्या मिळत असून, चित्रपटाचे पोस्टर देखील अनेक ठिकाणी जाळले जात आहे. माझी जीभ कपणाऱ्याला बक्षीस दिले जाणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे. मला वाटते या सर्व गोष्टी आता हळू हळू बॉलीवूडचा भाग झाल्या आहेत.”

अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विटला रिट्विट केले आहे. ज्यामध्ये काही वृत्तपत्रांची काही कात्रणे दिसत आहे. यामध्ये रिचा चड्डाची चीभ कापणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचे लिहिले आहे.

यावर स्वराने लिहिले की, ‘हे सर्व खूप लज्जास्पद आहे आणि या प्रकाराचा निषेध करायला हवा. मान्य आहे की एका चित्रपटाबद्दल तुम्हाला काही वैचारिक समस्या आहे. मात्र अशाप्रकारची शारीरिक हिंसा करण्याच्या धमक्या देणे चुकीचे आहे. आंबेडकारीवादी, दलित, स्त्रीवादी आणि केवळ समजूतदार लोकांनी याविरोधात उभे राहावे.’

आपल्या चित्रपटाच्या पोस्टरसाठी रिचा चड्डाने माफी मागितली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, तिच्या या पोस्टरवर खूप टीका केली जात आहे. मात्र हा एक सीन होता, पण अनेकांना तो प्रसंग दलितांना दाखविण्याची पद्धतच झाल्यासारखे वाटत आहे.

https://www.instagram.com/p/CKDOjYeD42x/?utm_source=ig_embed

चित्रपट ‘मैडम चीफ मिनिस्टर’ च्या मुख्य भूमिकेत रिचा चड्डा उत्तर प्रदेशातील एक माजी मुख्यमंत्रीकडून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपट २२ जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

हे देखील वाचा