Monday, July 1, 2024

भाऊ मिशालने लग्नात कियाराला दिली ‘ही’ खास भेट, संगीत नाईटचा व्हिडिओ शेअर करून दाखवली झलक

बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. कियारा आणि सिडने त्यांच्या राॅयल वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, परंतु त्यांच्या प्रीवेडिंग फंक्शन्सचे कोणतेही फाेटाे समोर आले नाही, पण आता कियाराचा भाऊ मिशाल अडवाणीने संगीत नाईटचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कियारा अडवाणी (kiara advani) हिचा भाऊ मिशालने इंस्टाग्रामवर संगीत नाईटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर असून आपल्या बहिणीसाठी खास परफॉर्मन्स देताना दिसत आहे. मिशालने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. तर मिशालच्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट लाईटने सजलेली आहे, पण या कार्यक्रमात कियारा आणि सिड कुठेच दिसत नाहीत.

मिशालच्या व्हिडिओवर कियाराने केली कमेंट
व्हिडिओ शेअर करताना मिशालने लिहिले की, ‘तेरी आंखों से याद आया मेरी बातों में प्यार.’ त्याच्या गाण्याची ही ओळ आहे, जी तो गुणगुणत आहे. कियाराने या व्हिडिओवर रेड हार्ट इमोजी कमेंट केली आहे. याशिवाय कियाराच्या खास दिवशी मिशालचा हा परफॉर्मन्स अनेकांना आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mishaal Advani (@mishaaladvani)

सिड आणि कियाराने 7 फेब्रुवारीला लग्न केले होते, तर दुसऱ्या दिवशी, दोघेही पहिल्यांदाच जैसलमेर विमानतळावर पती-पत्नीच्या रुपात दिसले. जैसलमेरहून ते दिल्लीला पोहोचले, जिथे मल्होत्रा ​​कुटुंबाने कियाराचे भव्य स्वागत केले. 10 फेब्रुवारीला या जोडप्याने दिल्लीत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते आणि आता मुंबईच्या रिसेप्शनची तयारी सुरू आहे.(bollywood actor sidharth malhotra and kiara advani wedding reception actress brother mishaal performed at her sangeet ceremony)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंगा गर्ल कंगना राणौतने आमिर खानवर साधला निशाणा, अभिनेत्याला म्हटले ‘बिचारा’

‘मनीमाऊचं बाळ कसं…’, मानसी नाईकचे लेटेस्ट फाेटाे एकदा पाहाच

हे देखील वाचा