Thursday, March 28, 2024

पंगा गर्ल कंगना राणौतने आमिर खानवर साधला निशाणा, अभिनेत्याला म्हटले ‘बिचारा’

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच कंगनाने आमिर खानबद्दल ट्विट केले होते. अभिनेत्रीच्या या ट्विटमुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये आमिरला ‘बिचारा’ म्हंटले आहे. खरे तर, आमिर खानला अलीकडेच लेखिका शोभा डे यांच्या भूमिकेसाठी कोणती अभिनेत्री परफेक्ट आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात आमिरने इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींची नावे घेतली होती.

आमिर खान (aamir khan) म्हणाला की, ‘दीपिका पदुकाेण, प्रियांका चाेप्रा आणि आलिया भट्टा या अभिनेत्री ही व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे साकारू शकतात, पण त्याच दरम्यान शोभा डे यांनी त्यांना थांबवले आणि सांगितले की, तुम्ही एका अभिनेत्रीचे नाव सांगायला विसरत आहात जिचे नाव आहे कंगना राणौत. आमिरने शोभाच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली आणि कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे आणि ती ही व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे साकारू शकते असे सांगितले.

कंगनाने आमिरचा हा व्हिडिओ ट्विट करत ‘बिचारा’ असे लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले की, ‘बिचारा आमिर खान… हा हा, मी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे, पण याची तुम्हाला कल्पनाच नसेल. तुम्ही उल्लेख केलेल्या अभिनेत्रींपैकी एकही नाही. यानंतर अभिनेत्रीने शोभा डे यांचे आभार मानले आणि लिहिले की @DeShobhaa जी मला तुमची भूमिका करायला आवडेल.’

कंगनाने पुढे लिहिले की, ‘शोभा जी आणि माझे राजकीय विचार जुळत नसतील, पण माझ्या कामाची, मेहनतीची आणि समर्पणाची प्रशंसा करण्यात त्या मागे हटत नाहीत. कंगनाने त्यांना नवीन पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या. ती म्हणाले की, मला माफ करा, माझ्याकडे चार राष्ट्रीय पुरस्कार आणि एक पद्मश्री पुरस्कार आहे. मात्र, मला तरिदेखील किती पुरस्कार मिळाले हेही आठवत नाही.’

कंगना राणाैतच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती लवकरच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. (bollywood actress kangana ranaut tweet on aamir khan call actor bechara on columnist shobhaa de book launch video goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम ओमला भेटली खऱ्या आयुष्यात स्वीटू, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ओ मेरी हंसीनी…! हुमा कुरेशीच्या साडीवर कातीलाना अंदाज, पाहाच व्हायरल फोटो

हे देखील वाचा