Monday, June 24, 2024

कियाराच्या मंगळसूत्रासाठी सिद्धार्थने खर्च केले तब्बल इतके काेटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचा लग्नसाेहळा 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड किल्ल्यावर पार पडला. यावेळी दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत होती. नवरीच्या पोशाखात कियारा राजकुमारीसारखी दिसत होती, तर सिद्धार्थही काेणत्या राजकुमार पेक्षा कमी दिसत नव्हता. मात्र, या सागळ्यामध्ये कियाराच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीचे मंगळसूत्र खूप आकर्षक आणि महाग आहे. हे मंगळसूत्र बनवण्यासाठी सिद्धार्थने करोडो रुपये खर्च केले आहेत. मनीष मल्होत्राने कियाराचा ब्राइडल लूक डिझाईन केला होता. मात्र, मंगळसूत्र दुसऱ्याने डिझाइन केले होते.

सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) याने प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेले मंगळसूत्र कियारा अडवाणीला दिले. हे सोनेरी मंगळसूत्र कियारावर खूपच क्यूट दिसत होते. कियाराला तिच्या लग्नानंतर जैसलमेर आणि दिल्ली विमानतळावर सिद्धार्थसोबत पाहिले गेले, तेव्हा चाहत्यांना तिचे हे मंगळसूत्र दिसले. सोन्याच्या मंगळसूत्राच्या मधोमध एक मोठा हिरा आहे, जो काळ्या मोत्यांनी जडवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

माध्यमातील वृत्तांनुसार, सिद्धार्थने कियाराला दिलेल हे मंगळसूत्र जवळपास 2 कोटी रुपयांच आहे. कियराच्या ब्राईडल ज्वलेरीबद्दल बाेलायचे झाले, तर ते ज्वेलरी मनीष मल्हाेत्राने डिझाइन केली आहे. विशेष म्हणजे मनीषने अद्याप त्याचे ब्राइडल ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलेले नाही. याची खास झलक सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातच पाहायला मिळाली.

kiara advani

लग्नापूर्वी मनीष मल्होत्रा ​​कियारा अडवाणीसोबत जैसलमेरला आला होता. दोघांना एकत्र पाहून सर्वांना वाटले की, मनीष कियाराचा ड्रेस डिझाइन करायला आला आहे, पण त्याने ड्रेस डिझाइनच नव्हे, तर तिच्या ब्राइडल ज्वलेरीची डिजाइनही खूप छान केली. या दागिन्याने कियाराच्या साैंदर्यात आणखीनच भर पडली.(bollywood actor sidharth malhotra spent 2 crores rupees for actress kiara advani mangalsutra specially designed by sabyasachi not manish malhotra deet inside)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाऊ मिशालने लग्नात कियाराला दिली ‘ही’ खास भेट, संगीत नाईटचा व्हिडिओ शेअर करून दाखवली झलक

ब्रेकअपनंतरही ‘या’ अभिनेत्रींने केले एक्स बॉयफ्रेंडसोबत चित्रपटात काम, पाहा यादी

हे देखील वाचा