Wednesday, June 26, 2024

सुनील शेट्टीने पहिल्यांदाच दाखवली आपल्या आलिशान बंगल्याची झलक, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा फिल्म इंडस्ट्रीतील अशा स्टार्सपैकी एक आहे जो अतिशय लग्जरियस लाइफ जगण्यावर विश्वास ठेवतो. सुनील अतिशय शानदार लाईफ जगतो. सुनीलकडे बरीच महागडी वाहने, आलिशान घरे आहेत, पण त्याचा खंडाळा बंगला राजवाड्यापेक्षा कमी नाही. सुनीलच्या घराची झलक अनेकवेळा पाहिली आहे. मात्र, पहिल्यांदाच त्याच्या घराचा आतला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही सुनील शेट्टीच्या घराचा प्रत्येक कोपरा पाहू शकता, जे खरोखरच एखाद्या स्वप्नातील महालापेक्षा कमी नाही.

सुनील शेट्टी (suniel shetty ) सध्या त्याची मुलगी अथिया शेट्टी (athiya shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (kl rahul) याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याचदरम्यान, त्यांच्या खंडाळ्यातील घराचा व्हिडिओही चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याचे घर एका टेकडीवर बांधलेले आहे. जे पुरेपूप निसर्गाच्या सानिध्यात असून तिथे फार प्रसन्न वातावरण आहे.

सुनीलच्या घरातील बहूतेक गाेष्टी आहेत प्राचीन
सुनील शेट्टी त्याच्या घराबद्दल सांगत आहे की, त्याचे निसर्गावर खूप प्रेम आहे. त्याच्या घरात भरपूर झाडे आहेत जे त्याला प्रचंड आवडतात. यासोबतच या व्हिडिओमध्ये सुनील लाकडी पुलावर उभा असून त्याच्या खालून पाणी वाहत असल्याचेही तुम्ही पाहू शकता. त्याच वेळी, घरातील बहुतेक गोष्टी निसर्गाच्या जवळ आहेत आणि बर्‍याच प्राचीन आहेत.

सुनील शेट्टीने केलंय अनेक दमदार चित्रपटात काम
सुनील शेट्टी यांच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘हेरा फेरी 3’, ‘भाई’, ‘धडकन’, ‘दिलवाले’, ‘कृष्णा’, ‘मे हू ना’, ‘दे दना दन’, ‘दस’, ‘चुप चुप के’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (bollywood actor suniel shetty khandala house inside video viral during athiya shetty and kl rahul wedding )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या ब्रेकनंतर आमिर खानची राकुमार संतोषी यांच्या चित्रपटातून दणक्या एंट्री; दिग्दर्शकांनी सांगितले…

आजपासून सुरु होणार अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे प्रीवेडिंग फंक्शन

हे देखील वाचा