Wednesday, December 6, 2023

रिअल लाईफ हिरो! तस्करीमध्ये अडकलेल्या तब्बल 128 महिलांना सुनील शेट्टीने दिले जीवनदान

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सुनील शेट्टी याने चित्रपटांमध्ये अनेकदा पोलिस आणि आर्मीमधील युवकाची भूमिका स्वीकरली आहे. त्याने पडद्यावर नेहमी गुंडांना धुळ चारुन गरिब लोकांचे आणि मुलिंचं आयुष्य वाचवलं आहे. मात्र, अभिनेत्याने पडद्याशिवाय खऱ्या आयुष्यामध्येही अशी कामगिरी बजावली आहे. त्याने कधी या गोष्टीचं श्रेय घेतलं नाही.  पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही तो हिरो ठरला आहे.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणारा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने नेपाळमधील तस्करी केल्या जाणाऱ्या मुलिंना मोठा मदतीचा हात दिला आहे. पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ता आणि आपल्या सासूच्या मदतीने त्या मुलिंना त्यांच्या स्वदेशात पाठवण्याची व्यवस्था केली. या घटनेला उजाळा सुनीलने देत सांगितेल होते की, या घटनेलर आधारित चित्रपट बनू शकतो. त्याशिवाय अभिनेत्याने 128 मुलिंचे आयुष्य वाचवण्याचे श्रेय देखिल घेण्यास नकार दिला. कारण यामध्ये अनेक लोकांचा मोठा वाटा होता.

सुनील शेट्टी याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “आम्ही फ्लाइट तिकिटाच्या किमतीचा विचार केला नाही. किंमत तितकी महत्त्वाची नव्हती. त्यासाठी प्रयत्न केले गेले. माझ्या सासूबाईंनी ‘सेव्ह द चिल्ड्रन’ एनजीओ सुरू केली आणि ती आजही सक्रिय आहे. आमच्यापैकी यात समाविष्ट आहे. या सगळ्या गोष्टींची प्रेरणा तिच्याकडूनच मिळते. तिनेच मुलींना वाचवण्याचा आणि माफियांपासून वैर पत्करण्याचा निर्णय घेतला.” शेट्टीने मुंबई पोलिस आणि नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजमध्ये “उत्साहीपणे” काम केले.

अभिनेत्याने ज्या महिलांना वाचवले होते त्यांचे नाव त्याला आठवणीत होते. सुनिलने सांगितले की, “कारण मी एक अभिनेता आहे. “पण मेहनत अनेकांची होती. पैशापेक्षाही आम्ही मुलांना मदत करू आणि एवढ्या मोठ्या माफियाविरुद्ध लढू, असे मन दाखवले आहे. पण अनेकांनी मेहनत घेतली. पैशापेक्षाही या महिलांना मदत करण्याचे आणि माफियांना बदनाम करण्याचे धाडस आम्ही सर्वांनी दाखवले.”

सुनील शेट्टीने पुढे सांगितले की, “सर्व प्रथम, आम्हाला स्वतःचं गौरव करायचं नव्हतं. त्यात या मुलींचा सहभाग असल्याने ते योग्य नव्हते. जितक्या लो प्रोफाइल ऑपरेशन्स व्हायला हव्या होत्या, तशाच झाल्या. त्यामुळे या घटनेची माहितीही कोणाला मिळाली नाही.” या घटनेकडे कधीच मीडियाचे लक्ष गेले नाही कारण यामध्ये अनेक लोकं सामिल होती आणि त्यांचा मुख्य हेतू म्हणजे  मुलिंना वाचवने होता.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस’च्या घरात श्रीजीता डेने खोलली टीना दत्ताची पोल म्हणाली, ‘हिला फक्त मुलांकडून…’
प्रथमेशला लागलेत लग्नाचे डोहाळे, ‘ढिशक्यांव’ चित्रपटाने केलं स्वप्न पूर्ण

हे देखील वाचा