Friday, July 5, 2024

हाय… मार डाला! ‘अण्णा’ सुनील शेट्टीच्या थ्रोबॅक फोटोची सोशल मीडियावर धमाल, पडतोय मजेशीर कमेंट्सचा पाऊस

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आज जरी चित्रपटसृष्टीपासून लांब असला, तरीही त्याच्या दमदार अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर आहे. सोशल मीडियावर तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या एका थ्रोबॅक फोटोमुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याने त्याचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करून असे कॅप्शन दिले आहे की, ते वाचून त्यावर कमेंट करायला कोणीही थांबवू शकत नाही. काहींनी तर अशा कमेंट केल्या आहेत, ज्या बघून सगळेजण आकर्षित झाले आहेत. कमेंट करणाऱ्यांमध्ये कलाकारांचाही समावेश आहे. त्याच्या या फोटोवर प्रचंड लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

सुनीलने त्याच्या अभिनयाच्या जुन्या दिवसातील एक फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शर्ट न घालता काढलेल्या या फोटोमध्ये तो खूपच डॅशिंग दिसत आहे. या फोटोमध्ये तो एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने स्वतःलाच हा प्रश्न विचारला आहे की, मी त्यावेळेस नक्की काय विचार करत होतो?

त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. त्याचा हा थ्रोबॅक फोटो पाहून त्याची मुलगी अथिया शेट्टी हिने देखील कमेंट केली आहे. तिने एक इमोजी पोस्ट करून तिचा भाऊ अहान शेट्टी याला टॅग केली आहे. तिच्या या कमेंटला सुनील शेट्टीने रिप्लाय देत ओए गुंडी असे लिहिले.

सुनील शेट्टीच्या या फोटोला अनेक कलाकाराच्या कमेंट येत आहेत. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने कमेंट केली आहे की, “अण्णा तू देवदास‌मधील मार डालासाठी प्रेरणा असू शकतो.” सुनील शेट्टीचा मल्याळम चित्रपट मारकर अरबी कदालिन सिम्हम या चित्रपटाला फीचर फिल्म आणि सर्वश्रेष्ठ व्हीएफएक्ससाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सुनील शेट्टीने यासाठी मोहनलाल आणि दिग्दर्शक प्रियदर्शनला धन्यवाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! होळीच्या दिवशी पत्नी गौरीसोबत डान्स करतानाचा शाहरुख खानचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘होळी पार्टीमध्ये एका व्यक्तीने माझ्या स्कर्टमध्ये हात…’, बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा