Tuesday, July 9, 2024

सुनील शेट्टीने दाखवले आपले मसल्स; पाहून चाहते तर सोडाच कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेते असे आहेत, जे आपल्या फिटनेसवर खूपच मेहनत घेताना दिसतात. यापैकीच एक अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी होय. सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, मग ते विनोदी अभिनेता म्हणून असो किंवा ऍक्शन अभिनेता. अभिनयाव्यतिरिक्त तो सोशल मीडियावरही जबरदस्त सक्रिय असतो. तो नेहमी आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. आताही त्याने आपला एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

सुनील शेट्टीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला फिटनेस फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आपले मसल्स दाखवताना दिसत आहे. वयाच्या ५९ व्या वर्षीही त्याची बॉडी एकदम जबरदस्त आहे. विशेष म्हणजे सुनील फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Bollywood Actor Suniel Shetty was ‘caught in the act’ and fans can’t get over him, see actor’s most charming pics)

सुनीलने हा जबरदस्त फोटो शेअर करत लिहिले की, “अभिनय करताना कॅमेरात कैद… स्ट्रेचिंग की फ्लेक्सिंग??”

या फोटोला आतापर्यंत १ लाखापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच्या या फोटोवर चाहते तर सोडाच कलाकारही कमेंट करून प्रतिसाद देत आहेत. या फोटोवर टीव्ही कलाकार सुधांशु पांडेने कमेंट करत “अल्फा” असे लिहिले आहे. त्याचबरोबर क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने लव्ह आणि स्मायलिंग विथ फेस इमोजी कमेंट केला आहे. अभिनेत्री दिया मिर्झानेही कमेंट करत वाघाच्या इमोजीचा कमेंटमध्ये समावेश केला आहे.

असे फोटो शेअर करण्याची सुनीलची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही त्याने वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

सुनील शेट्टीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने वयाच्या ३१ व्या वर्षी सन १९९२ मध्ये आलेल्या ‘बलवान’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्यात ‘दिलवाले’, ‘मोहरा’, ‘बॉर्डर’, ‘फिर हेरा फेरी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

तो शेवटचा ‘मुंबई सागा’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम, इमरान हाश्मी आणि महेश मांजरेकर, काजल अगरवाल यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा