Wednesday, June 26, 2024

धर्मेंद्र यांच्या घरी लवकरच वाजणार सनई! सनी देओलच्या मुलाने गुपचूप केला साखरपुडा?

बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांबद्दल बोलायचे झाले, तर त्यात सनी देओलचे नाव नेहमीच घेतले जाते. देओल कुटुंब अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा असताे. अशात सध्या सनी देओलचा मुलगा आणि अभिनेता करण देओल चांगलाच चर्चेत आला आहे. सनीचा लाडका लेक करणने गुपचूप एंगेजमेंट केली आहे आणि लवकरच ताे लग्न करणार आहे, असे म्हणटले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तानुसार, सनी देओलचा मुलगा करण देओलने एंगेजमेंट केली आहे. काही महिन्यांपूर्वी करण देओलने फारसा धूमधडाका न करता साखरपुडा केला. माध्यमातील वृत्तानुसार, करण देओलची हाेणारी पत्नी फिल्म इंडस्ट्रीशी काहीही संबंध ठेवत नाही. अशात या जाेडप्याच्या साखरपुड्यात संपूर्ण देओल कुटुंब सहभागी झाले होते. त्याचवेळी, या इंटिमेट रिंग सेरेमनीमध्ये करणचे आजोबा आणि आजी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी देखील या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले हाेते.

यासोबतच रिंग सेरेमनीनंतर करण देओलचे लग्न लवकरच होणार असल्याचेही सांगितले जात आहे. करण देओल पुढच्या महिन्यात लग्न करू शकते,अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकजण करण देओलच्या मंगेतराबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

करण देओलने 2019मध्ये केले बाॅलिवूडमध्ये पदार्पण
सनी देओलचा मुलगा करण देओलने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. 2019 मध्ये करण देओलने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. हा चित्रपट करणचे वडील आणि अभिनेता सनी देओल यांनीच दिग्दर्शित केला होता, तर बी टाऊन अभिनेत्री शेहर बंबा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती.(bollywood actor sunny deol son karan deol got engaged wedding likely after few months )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याला शाहरुखसोबत घ्यायची हाेती सेल्फी, पण संतापलेल्या अभिनेत्याने केले ‘हे’ कृत्य

हौसेला मोल नाही आणि फॅशनला तोड नाही! घटस्फोट झाल्यानंतर चक्क ‘या’ अभिनेत्रीने केले डिवोर्स फोटोशूट

हे देखील वाचा