Sunday, June 23, 2024

‘शीला की जवानी’गाण्यावर विकीने लावले जाेरदार ठुमके अन् पडता पडता वाचला अभिनेता, व्हिडिओ व्हायरल

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स’ (IIFA 2023) सुरू झाले आहेत. ही अवाॅर्ड नाईट अबुधाबीच्या आइलॅंडवर आयाेजित करण्यात आली आहे. अशात या कार्यक्रमाची सुरुवात 25 मे रोजी एका पत्रकार परिषदेने झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अवॉर्ड नाईटमध्ये सिनेविश्वातील स्टार्ससाठी ही एका प्रकारची मेजवाणीच आहे.

अशा परिस्थितीत सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विकी आयफाच्या मंचावर नाचताना दिसत आहे. अभिनेत्याचा हा डान्स म्हणजे परफॉर्मन्स नसून तो सारा अली खान आणि राखीसोबत स्टेजवर मस्तीत डान्स करताना दिसत आहे.

https://twitter.com/bollyvfx1/status/1662559538011320321?s=20

व्हिडिओमध्ये विकी कौशल, सारा अली खान आणि बॉलिवूडची ड्रामा गर्ल राखी सावंत दिसत असून कॅटरिना कैफचे ‘शीला की जवानी’ हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. अशा परिस्थितीत, नाचताना राखी अचानक थोडी जास्त एक्टिव होते, ज्यामुळे विकी कौशलचा पाय तिच्या ड्रेसमध्ये अडकतो आणि तो पडता पडता वाचताे. यादरम्यान, सारा लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे, तर राखी देखील लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे.

याशिवाय विकीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर एकटाच ‘शिला की जवानीची’च्या हुक स्टेप करताना दिसत आहे. यावेळी त्याच्याभोवती मौनी रॉय, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, चक्की पांडे देखील उभे आहेत.

विकी कौशल लवकरच सारा अली खानसोबत ‘जरा हटके के जरा बचके’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात एका विवाहित जोडप्याच्या घटस्फोटाची कथा दाखविण्यात आली आहे. अशाच ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून हा चित्रपट 2 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित हाेत आहे.(bollywood actor vicky kaushal danced on wife katrina kaif song sheila ki jawani on iifa 2023 stage )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साधी – भोळी टीना दत्ता बनलीय बोल्ड; मिनी स्कर्टमध्ये फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा
केदारनाथनंतर अक्षय कुमार पोहोचला बद्रीनाथला, ‘अशा’ प्रकरा केले चाहत्यांचे अभिवादन

हे देखील वाचा