बॉलीवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशात या चित्रपटाचा साेमवारी (दि. 15 मे)ला ट्रेलर लॉन्च कार्यक्रम ठेवण्यात आला. यादरम्यान ‘जरा हटके जरा बचके’ची स्टार कास्ट विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी मीडियाच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. दरम्यान, ट्रेलर लाँचच्या वेळी विकी कौशलला त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत असा प्रश्न विचारण्यात आला की, अभिनेत्याच्या मजेशीर उत्तराने ताे चांगलाच चर्चेत आला आहे.
‘जरा हटके जरा बचके’च्या ट्रेलर लॉन्चवेळी पत्रकार परिषदही घेण्यात आली, ज्यादरम्यान विकी कौशल आणि सारा अली खानला अनेक प्रश्न विचारण्यात आले. अशात पत्रकार परिषदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये एक पत्रकार विकी कौशलला प्रश्न विचारताना दिसत आहे की, ‘तुम्ही कॅटरिना कैफला घटस्फोट देऊन दुसऱ्या हीरोइनशी लग्न करू शकता का?’ हा प्रश्न ऐकून विकी कौशलला पहिले धक्काच बसला.
View this post on Instagram
यानंतर विकी कौशल उत्तर देत म्हणाला, “मला नंतर घरीही जायचं आहे. मी अजूनही लहान आहे. मला मोठं होऊद्या. जन्मोजन्मीचं आमचं नातं आहे.”अशाप्रकारे विक्की कौशलने मजेशीर पद्धतीने उत्तर देऊन सर्वांचेच लक्ष वेधले.
विकी कौशलच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून हा चित्रपट 2 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटात विकी काैशल व्यतिरिक्त सारा अली खान देखील मुख्य भूमिकेत आहे. विकी आणि सारा पहिल्यांदा या चित्रपटाद्वारे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.(Bollywood actor vicky kaushal react on divorce to katrina kaif during zara hatke zara bachke trailer launch)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट
अनारकली ड्रेसमध्ये हिना खानचे खुलले साैंदर्य, फाेटाे व्हायरल