Tuesday, August 12, 2025
Home मराठी दु:खद! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यात हाेणार अंत्यसंस्कार

दु:खद! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यात हाेणार अंत्यसंस्कार

सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. विक्रम गाेखले अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होता. अनेक दिवस जीवन-मरणाची लढाई लढणाऱ्या विक्रम गोखले यांनी अखेर शनिवारी (दि. 26 नाेव्हेंबर)ला या जगाचा निरोप घेतला.

काही दिवसांपूर्वी सिने आणि टीव्ही क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री तबस्सुम गोविल (tabassum govil) यांचे निधन झाले. बॉलीवूड त्यांच्या जाण्याच्या दु:खातून सावरले नव्हते, अशा परिस्थितीत विक्रम गोखले (vikram gokhale) यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, विक्रम गोखले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांची प्रकृती खालावत होती, त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

विक्रम गोखले यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हे राम’, ‘दे दना दन’, ‘बँग बँग’, ‘स्वर्ग नरक’, ‘इन्साफ’, ‘तुम बिन’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली. त्याच्या दमदार अभिनयासाठी त्यांना 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ‘अनुमती’ या मराठी चित्रपटासाठी देण्यात आला. विक्रम गोखले हे एक चांगले आणि नावाजलेले अभिनेते तर होतेच, पण ते पुण्यात अभिनयाची शाळाही चालवत असत. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबात, त्याचे आजी आणि वडील मराठी चित्रपट आणि रंगमंचावरील सुप्रसिद्ध अभिनेते होते.

काही दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी आली होती. त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी यावर शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली, त्यानंतर विक्रम गोखले जिवंत असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले. पत्नी वृषाली यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त फेटाळून लावले हाेते. (bollywood actor vikram gokhale passed away in pune)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टीव्हीपासून सिनेमापर्यंत विक्रम गोखलेंनी दाखवला दमदार अभिनय, ‘या’ चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वावर शोककळा

हे देखील वाचा