Saturday, June 29, 2024

पायाला पट्टी बांधलेली असतानाही विराट कोहली थिरकला शाहरुख खानसोबत, व्हिडिओ व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या 2023 सीझनच्या एका सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 81 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानही या सामन्यात टीमला चिअर करण्यासाठी पोहोचला होता. सामना संपल्यानंतर बॉलिवूडचा बादशाह क्रिकेटर विराट कोहलीला भेटला. यानंतर दोघांनीही पठाण चित्रपटातील ‘झूमे जो पठाण‘ या गाण्यावर डान्स केला.

सामना संपल्यानंतर शाहरुख खान (shah rukh khan) स्वतः विरोधी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (virat kohli) याला भेटायला पोहोचला. दोघांची भेट होताच शाहरुख खानच्या चित्रपटातील गाणे वाजू लागले. यानंतर कोहली आणि शाहरुखने डान्स करायला सुरुवात केली. यावेळी कोहलीच्या पायाला पट्टी बांधलेली हाेती. मात्र, त्याने कशाचे फिक्र न करता मनसाेक्त डान्स केला. यानंतर दोघेही बराच वेळ हसताना आणि विनोद करताना दिसले.

या सामन्यात केकेआरने आरसीबीचा खुप वाईटरित्या पराभव केला. कोलकाताने प्रथम खेळून 20 षटकांत 7 गडी गमावून 204 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना बंगळुरूचा संघ 123 धावांत गारद झाला. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 81 धावांनी पराभव केला आणि आयपीएल 2023 मधील पहिला विजय नोंदवण्यासाठी चार वर्षांनंतर या मैदानावर परतले.

शार्दुल ठाकूरने केकेआरसाठी पहिली फलंदाजी केली. शार्दुलने केवळ 29 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. यानंतर गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने 4, सुयश शर्माने 3 आणि सुनील नरेनने 2 बळी घेतले. याशिवाय शार्दुल ठाकूरला यश मिळाले.(bollywood actor virat kohli dance with shah rukh khan on jhume jo pathan song suhana khan kkr vs rcb ipl)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका

Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम

हे देखील वाचा