Saturday, July 27, 2024

मैं हूं ना सिनेमातील ‘त्या’ खास भूमिकेसाठी शाहरुख खानने ट्रिक वापरत सतीश शहा यांना केले होते तयार

शाहरुख खान बॉलिवूडचा किंग खान. त्याने त्याच्या करियरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. याच यादीतील एक सिनेमा म्हणजे ‘मैं हूं ना’. २००४ साली कोरिओग्राफर फराह खानने याच सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. या सिनेमात शाहरुखसोबतच अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले होते. यातलेच एक म्हणजे सतीश शहा. मनोरंजनविश्वातील दिग्गज आणि जेष्ठ विनोदी कलाकार म्हणून सतीश शाह ओळखले जातात. मैं हूं ना या सिनेमात त्यांनी प्रोफेसर माधव रसईवाला ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचे वैशिट्य म्हणजे ते एक त्यांना थुंकत बोलण्याची अथवा बोलताना ठाऊक उडवण्याची सवय असते. त्यांना ही भूमिका कशी मिळाली आणि यात शाहरुख खानने त्यांना कसे तयार केले याबद्दल नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले.

सतीश शाह यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, “तुम्हाला खरे वाटणार नाही मात्र या भूमिकेसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली होती. मला असे बोलण्याचा रोज सराव करावा लागला. ही ट्रिक फोटोग्राफी नव्हती. शाहरुख खूपच चतुर माणूस आहे. त्याने मला एक पर्याय दिला होता. तो मला म्हणाला सतीश भाई दोन भूमिका आहे प्रिन्सिपल आणि प्रोफेसर जो रागीट आहे आणि बोलताना थुकतो.”

पुढे सतीश शहा म्हणाले, “मी त्याला सांगितले की मी प्रिन्सिपलची भूमिका करेल. त्यावर तो म्हणाला तुम्ही याआधी देखील ही भूमिका अनेकदा केली आहे. मात्र प्रोफेसर रईस ही भूमिका वेगळी आहे, तुमच्यासाठी काही वेगळे असेल. तो असे बोलला आणि मला देखील ते पटले आणि मी तयार झालो.”

दरम्यान सतीश शहा यांची ही भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यांनी ती भूमिका खूपच उत्तम साकारली होती. २००४ साली आलेला मैं हूं ना हा सिनेमा त्या वर्षातील हिट सिनेमा होता. यात शाहरुख खानसोबतच सतीश शाह, सुनील शेट्टी, जायेद खान, अमृता राव, सुष्मिता सेन, किरण खेर, नसीरुद्दीन शाह, मुरली कृष्णा आदी अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

हे देखील वाचा