Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड तुझ्या कामाला सलाम! बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने केली २.५ लाखांपेक्षा अधिक कँसर पीडित मुलांची मदत

तुझ्या कामाला सलाम! बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने केली २.५ लाखांपेक्षा अधिक कँसर पीडित मुलांची मदत

जगभरात कॅंसर म्हणजेच कर्करोगाप्रती जागरूकता पसरवण्यासाठी गुरुवारी (४ फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला. कर्करोगाचा सामना करणे ही काही सोपी गोष्ट नाही. या रोगाशी लढा देण्यासाठी जगभरात योजना चालवल्या जात आहेत. याव्यतिरिक्त कर्करोगाविरुद्ध अनेक मोठ-मोठे कलाकारही आपले योगदान देत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचाही समावेश आहे. विशेष म्हणजे विवेक १८ वर्षांपासून हे काम करत आहे.

सन २००४ मध्ये विवेक ओबेरॉय कँसर पेशंट्स एँड असोसिएशन (CPAA) जोडला गेला आहे. तो सकारात्मक बदल करण्याच्या उद्देशाने आला आणि त्याने १८ वर्षांपूर्वी आपला वाढदिवस कर्करोगाने पीडित असलेल्या मुलांसोबत साजरा केला. त्यांना आनंदित करण्यासाठी विवेकने कर्करोगापासून सुटका झालेल्या लोकांना आमंत्रित केले आणि त्यांना देवदूत म्हणून बोलावले.

हे देखील वाचा