Saturday, June 29, 2024

मोठ्या पडद्यावरुन अचानक गायब झाले ‘हे’ बॉलीवूड कलाकार, कुठे गेले याचा कोणालाच पत्ता नाही

आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड स्टार्सबद्दलच सांगणार आहोत. ज्यांना स्टारडम मिळाले, पण दुर्दैवाने ते स्टारडम टिकू शकले नाही. या स्टार्सच्या पहिल्या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवले, पण काही काळानंतर ते बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून दूर गेले.

फरदीन खान
1998मध्ये आलेल्या ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून पदार्पणाचा पुरस्कार पटकावणाऱ्या फरदीन खानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. प्रेम अगन नंतर प्यार तूने क्या किया, ऑल द बेस्ट – फन बिगिन्स या चित्रपटात त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. फरदीन शेवटचा दुल्हा मिल गया या चित्रपटामध्ये दिसला होता. यानंतर फरदीन खानचे चित्रपट इतके फ्लॉप ठरले की तो इंडस्ट्रीपासून कायमचा दूर गेला.

विशाल ठक्कर
विशाल ठक्कर नावाचाही समावेश अनसंग स्टार्समध्ये आहे. संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील छोट्या भूमिकेने तो खूप प्रसिद्ध झाला. 2001 मध्ये ‘चांदनी बार’ या चित्रपटात तो पहिल्यांदा दिसला होता. विशालच्या कारकिर्दीत सर्व काही ठीक चालले होते पण विशाल एके दिवशी अचानक गायब झाला जे खरोखरच धक्कादायक होते. त्याचे अचानक गायब होण्याचे कारण नक्की काय होते ते अजुनही समोर आले नाहिये.

राहुल रॉय
राहुल रॉयने आपल्या अभिनय कारकिर्दीला महेश भट्ट यांच्या आशिकी चित्रपटातून सुरुवात केली. आशिकीच्या गाण्यांनी येताच धुमाकूळ घातला. या चित्रपटानंतर राहुल रॉयने 10हून अधिक चित्रपट साइन केले परंतु त्यापैकी एकही हिट झाला नाही आणि राहुल जितक्या वेगाने यशाची शिखरे चढला तितक्याच वेगाने तो खालीही आला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील भिडे अर्थात मंदार चांदवडकर एका भागासाठी घेतात तब्बल ‘इतकी’ रक्कम

हे देखील वाचा