Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड वयाच्या साठीतही एकदम फिट आणि ऍक्टिव्ह आहेत हे कलाकार; जाणून घ्या यादी

वयाच्या साठीतही एकदम फिट आणि ऍक्टिव्ह आहेत हे कलाकार; जाणून घ्या यादी

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे वयाची ६० वर्षे ओलांडल्यानंतरही त्यांच्या फिटनेस आणि उत्तम अभिनयाने सर्वांना प्रभावित करत आहेत. जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सुनील शेट्टी, चंकी पांडे आणि अनुपम खेर यांचा करिअर ग्राफ काय आहे ते जाणून घेऊया. हे कलाकार अलीकडे कोणत्या चित्रपटांमध्ये दिसले आणि त्यांचे आगामी चित्रपट कोणते आहेत.

जॅकी श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. जॅकी ६८ वर्षांचा असल्याचे सांगितले जाते, परंतु त्याच्या फिटनेस आणि आकर्षणावरून त्याच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. अलीकडेच जॅकी अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात दिसला होता. हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट होता. आता जॅकी अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ चित्रपटात सामील झाला आहे.

संजय दत्त ६५ वर्षांचा आहे. संजय आजही त्याच्या फिटनेस आणि दमदार अभिनयाने तरुणांना प्रेरणा देत आहे. संजय दत्तने KGF: Chapter 2 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तो शेवटचा ‘द भूतनी’ चित्रपटात दिसला होता. संजय टायगर श्रॉफसोबत ‘बागी ४’ या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त संजय ‘केडी द डेव्हिल’ मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सुनील शेट्टी ६३ वर्षांचे आहेत. ते त्यांच्या जबरदस्त फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखले जातात. सुनीलने ‘धारावी बँक’ या वेब सिरीजमध्ये डॉनची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये त्यांच्या फिटनेस आणि अभिनयाचे कौतुक झाले होते. याशिवाय सुनील केसरी वीरमध्येही दिसला आहे. तो येणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये दिसू शकतो.

चंकी पांडे ६२ वर्षांचा आहे. पण ६२ वर्षांचा असूनही, चंकी अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. चंकी पांडे त्याच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. अलीकडेच, चंकी ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसला. नेहमीप्रमाणे, प्रेक्षकांना चंकीची मजेदार शैली खूप आवडली.

अभिनेते अनुपम खेर ७० वर्षांचे आहेत. या वाढत्या वयाचा परिणाम अनुपमवर अजिबात दिसत नाही. ते अनेक चित्रपटांमध्ये सतत आपल्या अभिनयाची जादू पसरवत आहेत. अलीकडेच त्यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. अनुपम खेर त्यांच्या अभिनय आणि फिटनेससह दिग्दर्शनातही सक्रिय आहेत. याशिवाय ते द बंगाल फाइल्समध्ये दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

अभिनंदन ! सिद्धार्थ आणि कियाराला कन्यारत्न प्राप्त; सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
 ३४५ कोटींचा मालक असलेला हा अभिनेता आजही आईकडून घेतो पैसे; मोठ्या कुटुंबाचा आहे सदस्य…

हे देखील वाचा