बॉलीवूड एक झगमगाटी वेगळीच अशी दुनिया. रोज हजारो लोकं बॉलीवूडमध्ये आपले नशीब अजमावण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. या आभासी दुनियेत काही लोकं यशस्वी होतात तर काही हार मानतात. खूप संघर्ष करून अनेक लोकं छोट्या – मोठ्या भूमिका मिळवतात. आज आपल्या सिनेसृष्टीत अनेक उत्कृट अभिनय करणारे कलाकार आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. बॉलीवूडमध्ये यश मिळवल्यानंतर प्रत्येक कलाकाराला हॉलिवूड खुणावायला लागते. कमीतकमी एका तरी हॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे कलाकारांचे स्वप्न असते. अशातच बॉलीवूडमध्ये काही असे कलाकार आहेत ज्यांनी बॉलीवूड मध्येच नाही तर हॉलिवूड मध्येही यश मिळवले. पाहूया अशाच काही कलाकारांची नावे.
डिंपल कपाडिया :
‘बॉबी’ या पहिल्याच सिनेमातून डिंपल यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटातून काम केले. डिंपल यांनी बॉलीवूडला अनेक हिट सिनेमे दिले. डिंपल यांनी बॉलीवूडमध्ये एक संपूर्ण दशक रसिकांच्या मनावर राज्य केले. आजही त्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांना आणि त्यांच्या फॅन्सला दिसत असतात. डिंपल यांचा नुकताच पहिला वहिला हॉलिवूडपट ‘टेनेट’ प्रदर्शित झाला आहे. क्रिस्टोफर नोलन यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचे शूटिंग भारतातच झाले आहे.
इरफान खान :
दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या अभिनयाचे तर सर्वच वेडे आहे. त्यांनी त्यांच्या सशक्त अभिनयाने बॉलीवूडच्या प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या इरफान यांनी हॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी लाईफ ऑफ पाई, ज्युरासिक पार्क, न्यूयॉर्क, आई लव यू, ए माइटी हार्ट, द अमेजिंग स्पाइडर आदी हॉलिवूड सिनेमात काम केले.
ओम पुरी :
ओम पुरी आपल्या भारदस्त आवाजासोबतच कसदार अभिनयासाठी ओळखले जातात. ओम पुरी यांचा मराठी चित्रपटातून सुरु झालेला प्रवास हॉलिवूडपर्यंत अविरत चालला. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातून केली. पुढे त्यांनी अनेक हिंदी सिनेमातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. हॉलिवूडमध्ये त्यांनी माय सन फेनेटिक, ईस्ट इज ईस्ट, सिटी ऑफ जॉय, वॉल्ट, सिटी ऑफ द डार्कनेस, चार्ली विल्सन्स वॉर आदी चित्रपटात काम केले.
अमरीश पुरी :
खलनायकी भूमिकांसाठी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले अमरीश पुरी यांनी १९८४ साली हॉलिवूडच्या ‘इंडियाना जोन्स एंड द टेम्पल ऑफ़ डूम’ या सिनेमात नकारात्मक भूमिका निभावली होती.
नसीरुद्दीन शाह :
पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ कलाकार म्हणजे नसीरुद्दीन शाह.
नसीरुद्दीन शाह यांच्या जिवंत अभिनयाने बॉलीवूडसोबतच हॉलिवूडमध्येही नाव कमावले. द लीग ऑफ एक्स्ट्रा आर्डिनरी जेंटलमैन, द मॉनसून वेडिंग और द ग्रेट न्यू वंडरफुल या आंतरराष्ट्रीय सिनेमात काम केले.
ऐश्वर्या राय बच्चन :
विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या बॉलीवूडमध्ये तर लोकप्रिय आहे, शिवाय तिने हॉलिवूडच्या प्रोवोक्ड- ए ट्रू स्टोरी, ब्राइड एंड प्रेजुडाइस, मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेज, पिंक पेंथर २, द लास्ट लीजन या सिनेमातून काम केले आहे.
अनुपम खेर :
जेष्ठ कलाकार अनुपम खेर यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार मिळवले. आपल्या दमदार अभिनयाने अनुपम यांनी बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच अनुपम यांनी ब्राइड एंड प्रेजुडाइस, स्पीडी सिंह, बेंड इट लाइक बेकहम, सिल्वर लाइनिंग प्लेबुक या हॉलिवूड पटातही काम केले आहे.
मल्लिका शेरावत :
बॉलीवूडमध्ये बोल्ड अँड ब्युटिफूल अशी ओळख मिळवणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. मल्लिकाने बॉलीवूडसोबत हिस्स, द मिथ, पॉलिटिक्स ऑफ लव या हॉलिवूड सिनेमातही काम केले आहे.
दीपिका पादुकोण :
बॉलीवूडमधील दिवा म्हणून दीपिका पादुकोण ओळखली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारी दीपिकाने २०१७ साली हॉलिवूडच्या एक्ट्रेस त्रिपल एक्सः रिटर्न ऑफ जेंडर केज या सिनेमात विन डीजल सोबत दिसली होती.
प्रियांका चोप्रा :
मिसवर्ल्ड असणाऱ्या प्रियंकाने बॉलीवूड सोबतच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. २०१७ साली बेवॉच या सिनेमातून तिने हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर ती इजंट इट रोमांटिक सिनेमात दिसली. प्रियंकाने क्वांटिको या टीव्ही सिरीयलमध्ये मुख्य भूमिका साकारत तिने या मालिकेसाठी पीपल्स च्वॉइस अवॉर्ड सुद्धा मिळवला.
तब्बू :
तब्बूने २०१२ साली द लाईफ ऑफ पाई या सिनेमात भूमिका साकारली होती. शिवाय तब्बूने नेम सेक सिनेमा देखील केला.