Monday, June 17, 2024

अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

सध्या अफगाणिस्तान हा देश सर्वात मोठ्या संकटात अडकला असून, हा देश आता पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो या देशांनी त्यांचे सैन्य मागे घेतल्यानंतर तेथील नागरी सरकार कोसळले. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती असणाऱ्या अशरफ गनी यांनी देखील देश सोडला. अफगाणमध्ये आता सर्वत्र फक्त आणि फक्त अराजकता माजली आहे. प्रत्येक क्षणासोबत तेथील परिस्थिती अधिकाधिक भयानक होत आहे. टीव्ही, सोशल मीडियावर व्हायरल होणारे तेथील परिस्थितीचे व्हिडिओ खूपच भयावह आहे. अफगाणिस्तानची ही परिस्थिती पाहून इतर सर्व देशातील लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. अफगाणी लोकं सर्व सोडून फक्त स्वतःचा जीव वाचवण्याचा जीवघेणा प्रयत्न देखील करत आहे. ही सर्व परिस्थिती पाहून, बॉलिवूड कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करत आहेत.

कंगना रणौत
कंगनाने तिच्या इंस्टास्टोरीमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले असून, त्यात तिने म्हटले आहे की, “आज आपण हे सर्व चुपचाप पाहत आहोत, मात्र असेच उद्या आपल्यासोबतही घडू शकते. हे खूपच चांगले की मी सीएएसाठी लढली. मला संपूर्ण जग वाचवायचे आहे मात्र मला ते करण्यासाठी माझ्या घरापासून सुरुवात करावी लागेल.’

रिया चक्रवर्ती
रियाने देखील इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना लिहिले की, “एकीकडे जग पैशासाठी लढत आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये फक्त महिला विकल्या जात आहेत. जिथे स्त्रिया एक वस्तू बनल्या आहेत. ही स्थिती पाहून तेथील महिलांसाठी माझे हृदय तुटत आहे.’

शेखर कपूर
चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ट्विट करत लिहिले, ‘अफगाणिस्तानच्या लोकांसाठी विशेष प्रार्थना करा. परकीय शक्तींच्या वसाहतवादी महत्त्वाकांक्षांसाठी देश तुटला आणि उद्ध्वस्त झाला आहे.’

सोनी राजदान
आलिया भट्टची आई आणि अभिनेत्री असणाऱ्या सोनी राजदान यांनी ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे. त्यांनी लिहिले, ‘जेव्हा एक देश आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत होता, तेव्हा दुसरा देश त्यांचे स्वातंत्र्य गमावत आहे, काय जग आहे.’

टिस्का चोप्रा
टिस्का चोप्राने तिचा लहानपणीचा काबुल येथील एक पाहतो पोस्ट करत लिहिले की, ‘काबूल खूप सुंदर होते. ते खूप मोठा झाले होते. पण आता जे घडत आहे ते पाहून माझे हृदय तुटून गेले आहे. एका अतिशय सुंदर पण दुःखी देशाच्या शांतीसाठी प्रार्थना.’

सुनील शेट्टी
सुनील शेट्टीने एक विचार करायला लावणारा फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘अफगाणिस्तानचे सद्य परिस्थितीचे फोटो पाहून मी खूपच अस्वस्थ झालो आहे. अगदी आपल्यासारखेच पुरुष, स्त्रिया आणि मुले जगण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.’

यांसोबतच इतर अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे दुःख सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तृतीयपंथीयांवर केलेला विनोद कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीर दासच्या आला अंगाशी, सोशल मीडियावर मागावी लागली माफी

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

 

हे देखील वाचा